नवऱ्यापासून दूर जाण्याची ऐश्वर्याला वाटते भीती! डॉमिनेटिंग म्हटल्यामुळे अभिनेत्रीला अश्रू अनावर

Aishwarya and Neel : ऐश्वर्या आणि नील यांच्यात होत असलेले वाद पाहता नेटकऱ्यांनीच त्याना फक्त ट्रोल केलं नाही तर दुसरीकडे सेलिब्रिटींनी देखील त्यांना ट्रोल केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 4, 2023, 03:56 PM IST
नवऱ्यापासून दूर जाण्याची ऐश्वर्याला वाटते भीती! डॉमिनेटिंग म्हटल्यामुळे अभिनेत्रीला अश्रू अनावर title=
(Photo Credit : Social Media)

Aishwarya and Neel : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलीटी शो 'बिग बॉस 17' मध्ये यंदाच्या वेळी कपल्सनं एन्ट्री घेतली आहे. त्यात अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन. त्याशिवाय नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा आहेत. नेहमी प्रेक्षकांना हे दोन्ही जोडपं आनंदी वाटायचं. मात्र, जेव्हा पासून हे जोडपं बिग बॉसमध्ये आलं आहे तेव्हा पासून त्याची एकच चर्चा सुरु आहे. ते म्हणजे त्यांच्यात होणारी भांडणं. 

खरंतर, रविवारी प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा सोहेल खान आणि अरबाज खान स्पर्धकांचे मनोरंजन करताना दिसले. त्यांनी त्यांच्या जस्ट चिल या सेगमेंटमध्ये त्यांनी सगळ्या स्पर्धकांसोबत मस्ती केली आणि त्यांची खिल्ली उडवली. या दरम्यान, ते म्हणाले की 'नील भट्ट संपूर्ण सीजनसाठी नॉमिनेटेड आणि ऐश्वर्या शर्मा डॉमिनेटिंग आहे.' हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या हसताना दिसते. पण त्यानंतर ती नवरा नीलवर चिडल्याचे पाहायला मिळते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोहेल आणि अरबाज गेल्यानंतर ऐश्वर्या नील आणि रिंकूसोबत एका रुममध्ये बसली होती. या दरम्यान, त्यांनी रिंकूला म्हटलं की 'मी त्याला म्हटलं की मला माहितीये की तो लोकांसोबत कसा राहतो. हा या शोमध्ये माझ्यासोबत तसाच बोलतो जसं इतरांसोबत बोलतो. पण घरी माझ्यासोबत असा नसतो. मी त्या नीलला मिस करते. सगळे म्हणतात की मी त्याला इतरांशी बोलू देत नाही त्याला थांबवते. या सगळ्यात नील काही बोलणार असतो तेव्हाच ऐश्वर्या त्याला थांबवते आणि म्हणते की मी आता बोलते, नाही तर नंतर परत तू काही बोलणार नाही तर मीच डॉमिनेटिंग दिसणार आहे.'  यावेळी ऐश्वर्या बोलताना दिसली की ती तिच्या नवऱ्यापासून दूर होते आणि तिला अश्रू अनावर होतात. 

हेही वाचा : 'मला पुन्हा एकदा त्याच्यासोबत...', रणबीरसोबत न्यूड सीन देणाऱ्या तृप्ती डिमरीनं सांगितला अनुभव

दरम्यान, सलमान खाननं देखील ऐश्वर्याला नीलसोबत चांगली वागणूक नसल्याचे म्हणतं ओरडले होते. या वीकेंड का वार निमित्तानं करण जोहरनं शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी ऐश्वर्या ही नीलला तिच्या इशाऱ्यांवर नाचवते असं म्हटलं आणि आता सोहेल-अरबाजनं तिला डॉमिनेटिंग म्हटल्यानंतर ऐश्वर्या खूप नाराज झाली होती. याशिवाय ऐश्वर्या यावेळी बोलताना दिसली खरंतर तिनं नीलला विचारलं की तुला कधी हे जाणवलं का? त्यावर उत्तर देत नील म्हणाला की निर्मात्यांना काही गोष्टींमुळे वाटलं असेल.