फक्त सलमान खान नाही, तर 'या' सेलिब्रिटींचं तोंडही पाहात नाही ऐश्वर्या राय

इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटींसोबत ऐश्वर्या राय  शत्रूत्व, तुम्हाला विश्वास देखील होणार नाही...

Updated: Feb 11, 2022, 01:02 PM IST
फक्त सलमान खान नाही, तर 'या' सेलिब्रिटींचं तोंडही पाहात नाही ऐश्वर्या राय title=

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या सौंदर्यावर अनेक चाहते घायाळ आहेत. ऐश्वर्याची एक झलक पाहाण्यासाठी  तिच्यासोबत बोलण्यासाठी अनेक चाहतेचं नाही तर कलाकार देखील रांगेत असतात. पण आपल्या सुंदर अदांनी चाहत्यांना घायाळ करणरी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन काही सेलिब्रिटींचं तोंड देखील पाहत नाही. असे काही स्टार्स आहेत, ज्यांच्यासोबत ऐश्वर्याचा 36चा आकडा आहे. यामध्ये फक्त सलमान खान नाही तर अन्य सेलिब्रिटींचं नाव आहे. 

अभिनेत्री करीना कपूर खान

.aishwarya rai bachchan Kareena Kapoor Khan
बॉलिवूडची बेबो अर्थातचं करीना कपूर खान कायम तिच्या बोल्ड अदा आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे ओळखली जाते. कलाविश्वात ऐश्वर्या आणि करीनाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण दोघी प्रसिद्ध अभिनेत्रींमधील नातं काही ठिक नाही. 

अभिनेत्री राणी मुखर्जी
हिंदी कलाविश्वात राज्य करणारी अभिनेत्री राणी मुखर्जी आणि ऐश्वर्यामधील नातं काही ठिक नाही. ऐकेकाळी दोघी सख्या मैत्रिणी होत्या, पण 'चलते-चलते' चित्रपटानंतर त्यांच्या मैत्रीने एक नवं वळण घेतलं. सर्वप्रथम चित्रपटात ऐश्वर्या राय झळकणार होती. पण ऐश्वर्याला न सांगता राणीने चित्रपट साईन केला. 

अभिनेत्री सोनम कपूर 
एकदा सोनम कपूरने एका कार्यक्रमादरम्यान ऐश्वर्याला आंटी म्हणून हाक मारली. तेव्हापासून दोन्ही प्रसिद्ध अभिनेत्रींच्या नात्याल ब्रेक लागला. 

अभिनेता सलमान खान

salman khan is the most sexiest and gorgeous person according to aishwarya rai reveals in simi garewal show

ऐश्वर्या आणि सलमानच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या. पण दोघांचं नातं फार काळ काही टिकू शकलं नाही. दोघांमधील मैत्री देखील आता शिल्लक राहिलेलं नाही. पाहायला गेलं तर आता ऐश्वर्या आणि सलमान दोघेही त्यांच्या आयुष्यातील सर्व काही विसरून पुढे निघून गेले आहेत.