ऐश्वर्या रायचा पासपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल! फोटो पाहून चाहते म्हणाले...

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. तिच्या सौंदर्याची अनेकांना भूरळ पडली आहे.

Updated: Jun 14, 2022, 12:23 PM IST
ऐश्वर्या रायचा पासपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल! फोटो पाहून चाहते म्हणाले... title=

Aishwarya Rai Bachchan Photo On Passport: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. तिच्या सौंदर्याची अनेकांना भूरळ पडली आहे. सौंदर्यवती ऐश्वर्या रायने मिस वर्ल्ड हा पुरस्कारही पटकावला आहे. कोणतीही सर्जरी किंवा मेकअप न करता ऐश्वर्या राय सुंदर दिसते. आता ऐश्वर्या रायचा पासपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पासपोर्टवरील ऐश्वर्याचा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

जुन्या पासपोर्टवरील ऐश्वर्याचा फोटो पाहून तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. वास्तविक, सरकारी ओळखपत्रावर लोकांचे फोटो फारसे चांगले दिसत नाही. परंतु ऐश्वर्याच्या पासपोर्टवर तिचा फोटा सुंदर दिसत आहे.

पासपोर्टवरील ऐश्वर्याचा फोटो पाहिल्यानंतर तिचे चाहते म्हणाले की, हा जगातील एकमेव असा पासपोर्ट आहे ज्यावर कोणाचा तरी फोटो इतका सुंदर आहे. अभिनेत्रीचा हा पासपोर्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

ऐश्वर्या राय बच्चनला नुकतेच विचारण्यात आले होते की, ती अधिकाधिक चित्रपट का करत नाही? यावर प्रतिक्रिया देताना ऐश्वर्या राय म्हणाली होती की, 'सध्या माझे प्राधान्य माझे कुटुंब आणि माझी मुलगी आहे. मोठ्या कष्टाने मणिरत्नमचा 'पोन्नीयिन सेल्वन' हा चित्रपट नुकताच पूर्ण झाला आहे. मी माझ्या कुटुंबावर आणि आराध्यावर लक्ष केंद्रित करू इच्छिते.'