मुंबई : ऐश्वर्या राय बच्चनच्या (Aishwarya Rai bachchan) चाहत्यांसाठी खूशखबर आहे. बच्चन कुटुंबाची सून पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीसाठी मोठ्या पडद्यावर येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ऐश्वर्या दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नमच्या पीएस-1 या सिनेमात दिसणार आहे. जी एक मायथोलॉजिकल जॉनर मुव्ही आहे. या सिनेमात ऐश्वर्या एका वेगळ्याच लूकमध्ये दिसणार आहे. बुधवारी सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. सोबत सिनेमातील स्टार कास्टचा फर्स्ट लूक देखील शेअर करण्यात आला. (First look of aishwarya in PS1)
पीएस-1 हा सिनेमा 2 भागांमध्ये रिलीज होणार आहे. कल्किच्या क्लासिक नॉवल पोन्नियिन सेल्वनमधून सिनेमाची कथा घेण्यात आली आहे. ,लाइका प्रोडक्शन्स आणि मद्रास टॉकीजने सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा 30 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
पीएस-1 ची कथा ही दहाव्या शतकातील प्रमुख राजवंश चोल साम्राज्याच्या कालखंडातील आहे. ज्यामध्ये राजवंशाच्या उत्तराधिकाऱ्यांचा सत्ता संघर्ष दाखवण्यात आला आहे.
Wishing our Producer Allirajah Subaskaran a very happy birthday!
The Golden Era comes to the big screens on Sept 30th! #PS1 #PS1FirstLooks @LycaProductions #AishwaryaRaiBachchan pic.twitter.com/Gp0ajFlwvi— Madras Talkies (@MadrasTalkies_) March 2, 2022
ऐश्वर्या राय बच्चन सोबतच विक्रम, जयम रवी, कार्ति आणि शोभिता धुलिपाला प्रमुख भूमिकेत आहेत. पीएस-1 एक पॅन इंडिया सिनेमा असून तो तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड सोबतच हिंदी भाषेत रिलीज होणार आहे.
पीएस-1 सिनेमाच्या माध्यमातून ऐश्वर्या राय बच्चन 4 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर येत आहे. फन्ने खां हा तिचा शेवटचा सिनेमा होता. जो 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात राजकुमार राव आणि अनिल कपूर देखील होते. ऐश्वर्या सध्या मोजक्या सिनेमांमध्येच काम करते.