Aishwarya राय Angry response: बॉलिवूडचे पॉवर कपल म्हणजेच ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (abhishek bachchan) यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. ऐश्वर्या बच्चन कुटुंबीयांची सून झाली आणि अभिषेकच्या आयुष्यात मिस वर्ल्डची (miss world ) एंट्री झाली. 20 एप्रिल 2007 रोजी दोघांनी एकमेकांशी लग्न केले. यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या-अभिषेक मुलगी आराध्या बच्चनचे (aaradhya bachchan) आई-वडील झाले.
वर्षे उलटली पण ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेकचे प्रेम कमी झाले नाही.अनेक इव्हेंट्स आणि पार्टीमध्ये दोघे एकत्र स्पॉट केले जातात. (aishwarya abhishek spotted at party and events together)
पण त्यांच्या प्रेमावर सध्या प्रश्नचिन्हच उपस्थित करावं कि काय असं काही घडलं आहे.या दोघांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे आणि हा व्हिडिओ पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत.
दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे का, असे लोक विचारत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन नुकतेच डिझायनर मनीष मल्होत्राच्या (manish malhotra) घरी दिवाळी पार्टीसाठी पोहोचले होते. आता इथून त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) वाऱ्यासारखा पसरतोय,
यावर लोक अनेक कॉमेंट्स करू लागले आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये (viral video)आपण पाहू शकतोय कि , ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन दिवाळी पार्टीसाठी तयार होऊन आले आहेत दरम्यान पापाराझीं त्यांचे फोटो काढू लागले.
यावेळी गडबड झाली आणि चुकून अभिषेकचा ऐश्वर्याला धक्का लागला. मात्र यावर ऐश्वर्याने जी रिअक्शन दिली ती पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. (Aishwaraya viral angry reaction to abhishek)
ऐश्वर्या राय बच्चन ने इतक्या रागात अभिषेकला लुक दिला कि पाहणारे आता भलत्याच चर्चा करू लागले आहेत.
याशिवाय ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ऐश्वर्या मणिरत्नम (maniratnam) यांच्या 'पोन्नियिन सेल्वन-1' (Ponniyin Selvan: I ) मध्ये दिसली होती. प्रेक्षकांना हा चित्रपट आणि चित्रपटातील ऐश्वर्याचे पात्र खूप आवडले आहे. आता लोक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याशिवाय अभिषेक बच्चन अनुराग कश्यपच्या 'गुलाब जामुन' या चित्रपटात दिसणार आहे.