अग्निपंख... अग्निशमन दलाची झुंज पडद्यावर!

आजवर जीवाची बाजी लावून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या अनेक जवानांच्या कहाण्या सिनेरुपात पडद्यावर पाहायला मिळाल्या. परंतु, आता पहिल्यांदाच अग्निशमन दलातील जवानांवर पहिला भारतीय अॅक्शनपट येतोय... आणि तोही मराठीत...  

Updated: Aug 3, 2017, 03:50 PM IST
अग्निपंख... अग्निशमन दलाची झुंज पडद्यावर!  title=

मुंबई : आजवर जीवाची बाजी लावून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या अनेक जवानांच्या कहाण्या सिनेरुपात पडद्यावर पाहायला मिळाल्या. परंतु, आता पहिल्यांदाच अग्निशमन दलातील जवानांवर पहिला भारतीय अॅक्शनपट येतोय... आणि तोही मराठीत...  

'अग्निपंख' या सिनेमाचा टीजर पोस्टर नुकताच फेसबुकवर प्रदर्शित झाला. फायर ब्रिगेडवर आधारीत बीग बजेट सिनेमावर काम सुरू असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून होती. आता हा पोस्टर पाहून या सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. 

'विटीदांडू' या यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक गणेश कदम यांचा 'अग्निपंख' हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. महाकाय अग्नितांडव असो... भूकंप असो वा महाप्रलय, मनुष्यजीवासह प्राणी-पक्ष्यांचेही जीव वाचविण्याचे कार्य अग्निशमन दल प्रतिकूल परीस्थितीत करत असते. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता अग्निशामक जवानांची अग्नि आणि जीवसुरक्षेप्रती असलेली निष्ठा वेळोवेळी अधोरेखित झाली आहे. अशा कर्तव्यनिष्ठ अगिनिशमन दलाचा संघर्ष एका जबरदस्त थरारक आणि रोमांचकारी घटना या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.