मालिका सोडल्यानंतर 'बबड्या' नेमकं काय करतोय?

जुन्या बबड्या आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून

Updated: Apr 19, 2021, 02:42 PM IST
मालिका सोडल्यानंतर 'बबड्या' नेमकं काय करतोय? title=

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'अग्गंबाई सासूबाई'. या मालिकेने प्रेक्षकांना विचार करायला लावल्या. प्रेम हे फक्त तरूणपणातच होतं असं नाही. प्रेमाची गरज ही प्रत्येकाला असते. त्याला वयाचं बंधन नसतं. विधवा स्त्रीला आधाराची गरज असते. हा आधार जर तिला योग्य व्यक्तीकडून मिळाला तर तिचं पुढील आयुष्य आनंदाचं जाऊ शकतं. ही मालिका या विषयासोबतच 'बबड्या' या पात्रामुळे देखील आणखी चर्चेत आली. 

फक्त मनोरंजन क्षेत्रातच नव्हे तर अगदी राजकीय वर्तुळातही या मालिकेची चर्चा रंगली. आशुतोष पत्की याने 'बबड्या' म्हणजे सोहम कुलकर्णी हे पात्र साकारलं होतं. आशुतोषने आपल्या अभिनयाने प्रत्येकाला दखल घ्यायला भाग पाडली. मग तो कुणाचा कधी फेव्हरेट ठरला तर कधी व्हिलन. पण चर्चा मात्र झालीच. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काही दिवसांपूर्वी या मालिकेचं नवं पर्व सुरू 'अग्गंबाई सूनबाई' यामध्ये बबड्याची भूमिका अभिनेता अद्वैत दादरकर ही भूमिका साकारत आहे. अद्वैतने देखील प्रेक्षकांचं मन अगदी कमी वेळात जिंकलं आहे. पण असं असलं तरीही प्रेक्षकांना जुन्या बबड्याची आठवण येत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आधीचा बबड्या म्हणजे आशुतोष पत्की सध्या काय करतोय? हे जाणून घेणं प्रेक्षकांना आवडत आहे. आशुतोष खूप आरोग्याची काळजी घेतो. तो सध्या आपला जास्त वेळ जिममध्ये वर्क आऊट करत आहे. आशुतोषला जिममध्ये वेळ घालवायला आवडतं. या अगोदरही त्याने आपले वर्क आऊटचे फोटो पोस्ट केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अग्गंबाई सासूबाई या मालिकेतील प्रेक्षकांची आवडती जोडी तेजश्री प्रधान-आशुतोष पत्की या दोघांनीही प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. या दोघांना आजही प्रेक्षक खूप मिस करत आहेत.