'आजोबा काही सुपरस्टार नाहीत'; अगस्त्य नंदाचं अमिताभ यांच्याबद्दल जगावेगळं मत, कारण...

Agastya Nanda on Big B : अगस्त्य नंदानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आजोबा अमिताभ यांच्याविषयी वक्तव्य करत सांगितलं की त्यांनी आयुष्यात खूप काही मिळवलं पण माझ्यासाठी ते सुपरस्टार नाहीत. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 14, 2024, 01:10 PM IST
'आजोबा काही सुपरस्टार नाहीत'; अगस्त्य नंदाचं अमिताभ यांच्याबद्दल जगावेगळं मत, कारण... title=
(Photo Credit : Social Media)

Agastya Nanda on Big B : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांचे लाखो चाहते आहेत. फक्त अमिताभ नाही तर संपूर्ण बच्चन कुटूंब हे नेहमीच चर्चेत असतं. त्यांची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करताना दिसतात. सध्या बच्चन कुटूंबातील चर्चेत असणारी व्यक्ती म्हणजे अमिताभ यांचा नातू अगस्त्य नंदा आहे. अगस्त्य नंदानं 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर त्याच्या या पदार्पणानंतर त्यांची चांगलीत चर्चा सुरु आहे. या सगळ्यात अगस्त्यनं नुकतीच एक मुलाखत देत त्याच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 

अगस्त्य नंदानं बिग बींविषयी सांगितलं 'त्यांनी अनेक गोष्टी मिळवल्या आहे, पण सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे मी त्यांना सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या रुपात पाहत नाही. मी खरंतर त्यांना माझ्या आजोबाच्या रुपात पाहतो. त्यानं काही फरक पडत नाही की त्यांचे किती चाहते येतात आणि त्यांच्या अवतीभोवती त्यांचे चाहते घोळका करतात. मी नेहमीच त्यांना माझ्या आजोबांच्या रुपात पाहतो.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अगस्त्य नंदा पुढे आईविषयी म्हणाला माझी आई सगळ्यात मोठी ग्राऊंडिग फॅक्टर आहे. इतके तर माझे आजोबा देखील नाही. ती माझी आई आहे. अगस्त्यनं सांगितलं की त्याची आई अनेकदा समजवते की खूप मेहनत कर आणि जगात तुझं नाव होईल असं काम कर. 

अगस्त्यनं या मुलाखतीत आणखी एक किस्सा शेअर केला आहे. सिक्योरिटी गार्डनं कसं त्याला डिलिव्हरी बॉय समजलं याचा खुलासा त्यानं केला. 'मी एका दुसऱ्या ऑफिसमध्ये गेलो होतो, जिथे सिक्योरिटी गार्डनं म्हटलं की इथे ये, इथे ये. त्यांनी सांगितलं की इथे तुझं नाव लिहं. पॅकेज डिलिव्हरीची वेळ लिहं. मी म्हटलं की मी इथे पॅकेट देण्यासाठी आलो नाही. मी इथे दिग्दर्शकाला भेटण्यासाठी आलोय. मग त्यानं म्हटलं की खोट नको बोलूस.', असं अगस्त्यनं सांगितलं. इतकंच नाही तर सोशल मीडियावर नसल्यामुळे त्याच्यासोबत असं अनेकदा होतं असं त्यानं सांगितलं. 

हेही वाचा : ...तर तुमची पत्नी मुख्य अभिनेत्यासोबत झोपणार का?; श्रुती मराठेनं सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

अगस्त्य नंदाविषयी बोलायचे झाले तर त्यानं 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाचे दिग्दर्शन जोया अख्तरनं केलं होतं. तर अगस्त्यच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर अगस्त्यचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटानंतर आता अगस्त्य हा 'इक्कीस' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन हे करणार आहेत.