लग्नानंतर vicky kaushal पुन्हा कामावर रुजू, समोर आला खास फोटो

या जोडप्याने आता सुखी संसाराला सुरुवात केली आहे. 

Updated: Dec 18, 2021, 01:05 PM IST
 लग्नानंतर vicky kaushal पुन्हा कामावर रुजू, समोर आला खास फोटो  title=

मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. कतरिना आणि विकीच्या लग्नाला खूप मर्यादित लोकं आले होते आणि हे लग्न राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये पार पडलं. विकी-कतरिनाच्या हळदी समारंभापासून ते लग्नापर्यंतचे सगळे फोटो त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 

 सगळ्यांनाच आपल्या दमदार अभिनयाने आणि स्टाईलने आपल्या प्रेमात पडणाऱ्या कतरिनाने आता विकीचं ही मनं जिंकलं आहे. लग्नानंतर नुकतीच कतरिनाने विकीसाठी खास डिश तयार केली होती. गोड हलवा तयार केल्याचा फोटो कतरिनाने शेअर केला होता. त्यानंतर विकीने देखील हलव्याचा फोटो स्टोरीवर शेअर केला आणि पत्नीचं तोंड भरुन कौतुक केलं. 

त्यानंतर आता विकीने आपला एक सेल्फी पोस्ट केला आहे. तो लग्नानंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात करत आहे. फोटो शेअर करत त्याने पहिला चहा मग काम असं कॅप्शन देखील लिहिलं आहे. त्यामुळे अनेकांनी कतरिनाच्या हातच चहा पिऊन मगच कामाला सुरुवात करणार का असा प्रश्न देखील विचारला आहे. तर अनेकांनी त्याला हलव्याची सुद्धा आठवण करुन दिली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

या जोडप्याने आता सुखी संसाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे ते शेअर करत असलेले प्रत्येक मुव्हमेंट चाहते देखील एन्जॉय करताना दिसत आहेत.पण विकिने सांगितल्याप्रमाणे चहानंतर तो कामाला आता सुरुवात करणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता लग्नाच्या भव्य रिसेप्शनबाबत देखील अनेक बातम्या समोर येत आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात आहे की, विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन मुंबईत होणार आहे आणि त्यात बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. त्यामुळे लवकरच त्यांच्या रिसेप्शन पार्टीचे फोटो देखील समोर येतील.