MMS लीक झाल्यानंतर अंजली अरोरा आता दिसली अशा अवस्थेत; व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडिया स्टार आणि कंगना रानौतचा शो लॉकअपमुळे घरोघरी प्रसिद्ध झालेली अंजली अरोरा अनेकदा चर्चेत असते. 

Updated: Aug 13, 2022, 06:23 PM IST
MMS लीक झाल्यानंतर अंजली अरोरा आता  दिसली अशा अवस्थेत; व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : सोशल मीडिया स्टार आणि कंगना रानौतचा शो लॉकअपमुळे घरोघरी प्रसिद्ध झालेली अंजली अरोरा अनेकदा चर्चेत असते. अलीकडेच ती दोन कारणांमुळे चर्चेत आहे. एक म्हणजे तिचं नुकतंच रिलीज झालेलं नवीन गाणं आणि दुसरं म्हणजे सोशल मीडियावर लीक झालेला MMS व्हिडिओ. व्हिडीओ लीक झाल्यामुळे अंजली अरोरा खूपच नाराज आहे. तर गाणं हिट झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. यामुळेच यावेळी गाण्यात अंजलीला तिच्या लूकमध्ये सर्वत्र स्पॉट्स केलं जात आहेत.

अंजली अरोराचं गाणं झालं हिट
अंजली अरोराचं नवीन गाणं हे एक रिमिक्स साँन्ग आहे. जे याआधीही रिमिक्स होऊन रिलीज झालं आहे. 'सैयां दिल में आ ना रे' हे गाणं एका नव्या स्टाईलमध्ये रिलीज करण्यात आलं आहे. ज्याला खूप पसंतीही मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत या गाण्याला 7 मिलीयन व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे अंजली अरोरा खूप खूश आहे आणि तिने पापाराझींसोबत केक कट करुन हा आनंद साजरा केला. यावेळी अंजली पांढऱ्या रंगाच्या लेहेंगा चोलीमध्ये दिसली. आपलं गाणं हिट झाल्याचा आनंद तिने सोशल मीडियावर शेअर केला आणि केकही कट केला.

व्हिडिओ लीक झाल्याने अंजली अरोरा रडू लागली
अलीकडेच, सोशल मीडियावर एक एमएमएस व्हिडिओ लीक झाला आहे. ज्यामध्ये दिसणारी मुलगी अंजली अरोरा असल्याचं सांगितलं जात आहे. असं असलं तरी काही लोकं त्या मुलीला अंजली म्हणून स्वीकारण्यास नकार देत आहेत. त्याचबरोबर जेव्हा या व्हिडिओची अधिक चर्चा झाली आणि अंजलीला यावर प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली. यानंतर अंजलीने रडत आपली बाजू  कॅमेऱ्यांसमोर मांडली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी बोलताना अंजली  म्हणाली की, हा व्हिडिओ माझा नाहीये. आणि तो का व्हायरल केला जातोय. हे मला माहित नाही. तिच्या म्हणण्यानुसार, तिचं कुटुंबीयही हे सगळे व्हिडिओ पाहतात. या सगळ्याला तोंड द्यायला आपण अजिबात तयार नसल्याची कबुलीही तिने दिली.