सुशांत-अंकिताचं ब्रेकअप, अशा परिस्थितीत विकी झाला पती

अंकिताचं ब्रेकअप झाल्यानंतर विकीने बजावली महत्त्वाची भूमिका  

Updated: Dec 19, 2021, 12:49 PM IST
सुशांत-अंकिताचं ब्रेकअप, अशा परिस्थितीत विकी झाला पती title=

मुंबई : 'पवित्र रिश्ता' मालिके दरम्यान अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांची मैत्री इतकी घट्ट झाली की, दोघांनाही ते एकमेकांसाठी परफेक्ट वाटत होते. चाहत्यांनी देखील त्यांची जोडी डोक्यावर घेतली. पण त्यांचं जास्त काळ टिकू शकलं नाही. सहा वर्षांनंतर ते विभक्त झाले. एका मुलाखतीत अंकिता लोखंडे म्हणाली होती की, लोकांना वाटते की मी सुशांत सोडलं, पण हे खरे नाही. सुशांतने त्याचे करिअर निवडले आणि पुढे गेला. 

अंकिता पुढे म्हणाली, 'मी त्याला असं करण्यापासून रोखले नाही, पण माझ्यासाठी सर्व काही संपलं होतं. ब्रेकअपनंतर अडीच वर्षे मला काय करावं समजत नव्हतं, पण या काळात माझे आई-वडील नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी मला पाठिंबा तर दिलाच पण पूर्ण वेळही दिला. असं देखील अंकिता म्हणाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अडीच वर्षांनंतर तिने काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर जेव्हा सुशांतने आत्महत्या केली, तेव्हा त्यांचं पुन्हा चर्चेत आलं. पण त्यावेळी अंकिताच्या आयुष्या त्या खास व्यक्तीची एन्ट्री झाली होती. या दुखातून बाहेर येण्यासाठी विकीने अंकिताची मदत केली. 

पार्टीत भेटले विकी आणि अंकिता
अंकिता लोखंडे आणि विकी जैन मित्र होते. ब्रेकअपनंतर अंकिताने बाहेर जाणं, लोकांशी बोलणं, भेटणं बंद केले होतं, पण या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तिने पुन्हा मित्रांसोबत बोलायला सुरुवात केली. मित्राच्या पार्टीत अंकिता आणि विकी भेटले. 

2018 मध्ये अंकिताने विकीसोबतच्या नात्याचा केला स्वीकार
2018 मध्ये अंकिताने विकीसोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं. दोघांनीही आपल्या नात्याला वेळ दिला, एकमेकांना समजून घेतलं आणि मग ठरवलं की आता लग्न करायचं. काही दिवसांपूर्वीचं दोघांनी लग्न केलं. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.