'स्त्री 2' ला यश मिळूनही राहतं घर सोडून भाड्याच्या घरात राहणार श्रद्धा: महिन्याला देते लाखोंचं भाडं

Shraddha Kapoor Rented House in Mumbai : 'स्त्री 2' घवघवीत यश मिळाल्यानंतरही श्रद्धा कपूर झाली भाड्याच्या घरात शिफ्ट

दिक्षा पाटील | Updated: Dec 3, 2024, 10:50 AM IST
'स्त्री 2' ला यश मिळूनही राहतं घर सोडून भाड्याच्या घरात राहणार श्रद्धा: महिन्याला देते लाखोंचं भाडं title=
(Photo Credit : Social Media)

Shraddha Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अजून या चित्रपटातील गाणी लोकं गुणगूणताना दिसतात. दरम्यान, आता 'स्त्री 2' च्या यशानंतर श्रद्धा कपूरनं मुंबईच्या जुहू परिसरात एक अपार्टमेंट घेतला आहे. हा अपार्टमेंट श्रद्धानं खरेदी केला नसून भाडेतत्वावर घेतला आहे. या अपार्टमेंटचं भाडं हे काही 1-2 लाख नाही तर तब्बल 6 लाख प्रतिमहा आहे. 

Zapkey नं दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 3928.86 स्क्वायर फूट एरियाचा हा अपार्टमेंट आहे. तर हा अपार्टमेंट 1 वर्षांच्या भाडेत्त्वावर घेण्यात आलाय. असं म्हटलं जातं की या अपार्टमेंटसाठी श्रद्धानं आगाऊ बूकिंग केली आहे आणि त्यासाठी तिनं 72 लाख रुपये आधीच देऊ केले आहे. या अपार्टमेंटसाठी श्रद्धानं 16 ऑक्टोबर रोजीच डील केली होती. त्यात 4 कार पार्किंग एरिया देखील आहे. यासोबत या ट्रांझेक्शनवर 36 हजार स्टॅम्प ड्यूटी आणि 1000 रुपये रजिस्ट्रेशन फी देण्यात आली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

श्रद्धा कपूर आधी दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर हा मुंबईच्या पाली हिल परिसरात 3 वर्ष राहिला होता. त्यावेळी तो 8 लाख रुपये महिन्याचं भाडं द्यायचा. त्याशिवाय बॉलिवूड अभिनेता इमरान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लेखा वॉशिंगटननं करण जोहर कडून मुंबईच्या वांद्रे परिसरात 9 लाख रुपये प्रती महिना या भाडेतत्वावर तीन वर्षांसाठी एक फ्लॅट घेतला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : दीपिकानंतर आता 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्रीच्या मुलीच्या नावाची चर्चा, पण अर्थ काय?

दरम्यान, श्रद्धाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर जवळपास 12 वर्षांपासून ती अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. श्रद्धानं 'तीन पत्ती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण तिला खरी लोकप्रियता ही 'आशिकी 2' या चित्रपटामुळे मिळाली. श्रद्धा कपूरनं 'बागी', 'छिछोरे' आणि 'स्त्री 2' सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. तिच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये 'स्त्री 2' चं नाव सहभागी आहे. इतकंच नाही तर 2015 मध्ये श्रद्धा ही 'फोर्ब्स इंडिया सेलिब्रेटी 100' च्या लिस्टमध्ये सहभागी झाली होती.