Bigg Boss 15: राकेश बापट बाहेर जाताच शमिता शेट्टीसोबत अभिनेत्याने केली 'ही' गोष्ट

तर राकेश बापट यांनी वैद्यकीय कारणांमुळे घर सोडले. 

Updated: Nov 15, 2021, 05:58 PM IST
 Bigg Boss 15: राकेश बापट बाहेर जाताच शमिता शेट्टीसोबत अभिनेत्याने केली 'ही' गोष्ट title=

मुंबई : 'बिग बॉस 15' मधील शेवटचा आठवडा चढ-उतारांनी भरलेला होता. गेल्या आठवड्यात दोन स्पर्धक वेगवेगळ्या कारणांमुळे बेघर झाले. अफसाना खानला हिंसक वर्तनामुळे शोमधून बाहेर काढण्यात आले, तर राकेश बापट यांनी वैद्यकीय कारणांमुळे घर सोडले. 

वीकेंड का वार मध्ये, सलमान शमिताला सांगतो की, राकेशला बरे वाटत नाही आणि त्याला विश्रांती घ्यायची आहे म्हणून तो शोमध्ये परतणार नाही. राकेशच्या गैरहजेरीच्या बातमीने शमिता रडू लागते.

राकेशच्या जाण्यानंतर शमिता खूप अस्वस्थ दिसत आहे, तर अभिनेता गेल्यावर विशालने आपला खेळ दाखवायला सुरुवात केली आहे. समोर आलेल्या व्हिडिओत विशाल शमिताच्या पाठीत वार करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एकीकडे शमिता राकेश परत न आल्याने रडत आहे, तर दुसरीकडे विशाल तिच्याविरोधात प्लॅनिंग करत आहे.

विशाल म्हणतो भाऊ-बहिणीचं नातं एका बाजूला आणि खेळ एका बाजूला. विशालचे बोलणे ऐकून करण कुंद्राही आश्चर्यचकीत झाला आहे.