Pakistani Actors : पाकिस्तानी क्रिकेटर्स बुधवारी जवळपास सात वर्षांनंतर भारतात आले आहेत. आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी क्रिकेटर्स इथे पोहोचले आहेत. 2016 नंतर पहिल्यांदा पाकिस्तानच्या लोकांना भारतात येण्याची परवानगी मिळाली आहे. त्याचे कारण म्हणजे 2016 मध्ये झालेल्या उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी लोकांना भारतात येण्याच परवानगी नव्हती, त्यांच्यावर बॅन आणण्यात आला होता. आता पाकिस्तानी मेन्स क्रिकेट टीमला भारतात येण्याची परवानगी मिळाल्याचे पाहताच, 'रईस' दिग्दर्शक राहुल ढोलकियानं अशी आशा केली आहे की पाकिस्तानी कलाकार आणि गायक देखील आता भारतात परर्फॉर्म करतील.
पाकिस्तानी क्रिकेटर हे 27 सप्टेंबक रोजी संध्याकाळी दुबई व्हाया हैदराबादला पोहोचले. ते पाहताच दिग्दर्शक राहुलनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत की आता पाकिस्तानी कलाकार आता भारतात येऊ शकतली. त्यांनी हे वक्तव्य एक्स अकाऊंट म्हणजेच पूर्वीचे ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. काय म्हणाले राहुल ढोलकिया एकदा पाहाच, आता जर पाकिस्तानी क्रिकेटर्स अधिकृतपणे इथे आलेत तर आता आम्ही पाकिस्तानी कलाकारांना देखील आमच्या चित्रपटात काम करण्यासाठी बोलवू शकतो? किंवा म्युजिशियनला परफॉर्म करण्यासाठी?
Now that #Pakistani cricketers are officially here, can we also invite Pakistani actors to act in our films ? Or Musicians to perform?
— rahul dholakia (@rahuldholakia) September 28, 2023
राहुल यांनी शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला की 'हे माझं स्वप्न आहे की असा एक चित्रपट असावा ज्यात भारतीय आणि पाकिस्तानी कलाकार एकत्र असावे. आतापर्यंत हे कता झालं नाही.' दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली की 'बीसीसीआय करेल तर योग्य पण बॉलिवूड करू शकत नाही.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'बॉलिवूडला नेहमीच टार्गेट करण्यात येतं. जर क्रिकेटर्सना परवानगी आहे की कलाकारांना का नाही?' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'मला अतिफ असलम आणि राहत फतेही अली खान यांची खूप जास्त आठवण येते.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'तुम्हाला रईस 2 बनवायचा आहे का?
हेही वाचा : 'गदर 2' ने रचला इतिहास! ठरला हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
रईस या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान दिसली होती. या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण 2017 नंतर परिस्थिती खराब झाल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांना बॅन केलं होतं. माहिराच्या चित्रपटाला पाकिस्तानमध्ये सेंसर बोर्डानं देखील पास केलं नव्हतं.