मुंबई : 'सोनू के टीटू की स्वीटी' हा सिनेमा सध्या चौथ्या आठवड्यामध्ये आहे.
नुकताच अजय देवगणचा 'रेड' चित्रपटही रीलीज झाला आहे. मात्र बॉक्सऑफिसवर त्याचा एकामेकांवर परिणाम झालेला दिसत नाही.
Truly UNSTOPPABLE... and counting... #SonuKeTituKiSweety marches into 100 cr Club... SECOND FILM to cross 100 cr mark in 2018, after #Padmaavat... [Week 4] Fri 1.27 cr, Sat 2.11 cr, Sun 2.32 cr, Mon 76 lakhs. Total: 100.10 cr. India biz... #SKTKS
— taran adarsh (@taran_adarsh) March 20, 2018
सोनू के टीटू की स्वीटी या चित्रपटाने चौथ्या आठवड्यामध्ये 100 कोटींचा टप्पा गाठला आहे. कोणताही मोठा कलाकार या चित्रपटामध्ये नाही. बॉलिवूडमध्ये नवख्या असणार्या कलाकारांनी हे यश मिळवले असल्याने त्याबद्दल सार्यांना कौतुक आहे.
Super duper happy!!! Cheers to the entire team as #SonuKeTituKiSweetyHits100CR! @luv_ranjan @gargankur @TheAaryanKartik @NushratBharucha @TSeries @Luv_Films @SonuTituSweety pic.twitter.com/s8FMh4cmoT
— Sunny Singh (@mesunnysingh) March 20, 2018
कार्तिक आर्यन आणि सनी सिंह या चित्रपतातील प्रमुख कलाकारांनी ढोल वाजवत, भांगडा करत 100 कोटी क्लबचं यश सेलिब्रेट केलं आहे. कार्तिकलाही चाहत्यांचं खूप प्रेम मिळालं आहे. सोशलमीडियावरही आयर्नचे चाहते दिवसेंदिवस वाढत आहेत.