MMS लीक झाल्यानंतर Anjali Arora ची लग्नघाई? सोशल मीडियावर मोठी घोषणा

Anjali Arora :  आता कथित MMS लीक (MMS leak) झाल्यानंतर अंजलीने तिच्या सोशल मीडियावर मोठी घोषणा (Big news) केली आहे. 

Updated: Oct 4, 2022, 10:24 AM IST
MMS लीक झाल्यानंतर Anjali Arora ची लग्नघाई? सोशल मीडियावर मोठी घोषणा title=
after mms leak anjali arora will get married nmp

Anjali Arora :  'कच्चा बदाम' (Kacha Badam) गाण्यावर आणि 'लॉकअप'मध्ये (Lock Upp) धुमाकूळ घालणारी अंजली अरोरा पुन्हा एका चर्चेत आली आहे. यापूर्वी तिच्या कथित MMS ने सोशल मीडियावर (social media) एकच खळबळ माजवली होती. या MMS मुळे तिला खूप मनस्ताप झाला होता. आता कथित MMS लीक (MMS leak) झाल्यानंतर अंजलीने तिच्या सोशल मीडियावर मोठी घोषणा (Big news) केली आहे. (after mms leak anjali arora will get married nmp)

अंजली अरोरा आता लग्न करणार? 

अंजली अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते, जे पाहताच व्हायरल होतात. अलीकडेच अंजली अरोराने तिच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून लग्न करण्याची घोषणा केली आहे. तिने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अंजली अरोरा नववधूच्या वेशात दिसत आहे. फोटोमध्ये तिने रेड कलरची साडी (saree) तसंच भारी दागिने घातले आहेत. हातात लाल, हिरव्या बांगड्यांसोबतच अंजलीने कपाळावर बंदी लावली आहे. अभिनेत्रीचे हे फोटो पाहून ती लवकरच वधू होणार आहे, असं वाटतं आहे. 

अंजली हिच्या लग्नाची चर्चा होण्यामागे अजून एक कारण तिने या फोटो दिलेलं कॅप्शन...हे फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "मोठ्या दिवसासाठी तयार होत आहे आणि लवकरच ती मोठी घोषणा करणार आहे." ("Getting ready for the big day. Big news is on the way.")

त्यामुळे अंजलीच्या या फोटोंवर कमेंट करत लोक विचारत आहेत की ती लग्न करणार आहे का? मात्र, अंजलीने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

अंजलीची 'या' व्यक्तीसोबत बांधणार लग्नगाठ? 

अंजली अरोरा सध्या आकाश सांसनलालची (Akash Sansanlal) डेट करत आहे. आकाश संसारलाल हा व्यवसायाने डिजिटल क्रिएटर आहे आणि सोशल मीडियावर त्याचे खूप चाहते आहेत. इतकंच नाही तर आकाश स्वतःच्या नावाने सोशल मीडियावर भाजपचं (BJP) अकाऊंटही चालवतो. अंजली आणि आकाश दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत, त्यामुळे आकाश आणि अंजली लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची शक्यता चाहत्यांनी बांधली आहे.