ही कधी नीट का नाही चालत; मलायकानंतर नोरा फतेही चालण्यावरून ट्रोल

नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Updated: Aug 26, 2022, 09:47 AM IST
ही कधी नीट का नाही चालत; मलायकानंतर नोरा फतेही चालण्यावरून ट्रोल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नोरा तिच्या बोल्ड फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते. नोरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत नोरा चाहत्यांच्या संपर्कात राहते. नोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी नोराला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले आहे. 

नोराचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत नोरा गाडीतून उतरताना दिसते. नोरानं पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी तिला कमेंट करत म्हणाला, ही कधी नीट का नाही चालत. दुसरा नेटकरी म्हणाला, ती कधी नीट चालयाला शिकणार. पण दुसरीकडे काही नेटकरी आहेत ज्यांना नोराचा हा लूक प्रचंड आवडला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिचा म्युझिक व्हिडिओ 'डान्स मेरी रानी' खूप गाजला होता. व्हिडिओतील नोराचा लूक शकीराच्या लूकपासून प्रेरित होता. नोराच्या डान्सवरून तिला ट्रोलही करण्यात आलं होतं. लोक तिला 'स्वस्त शकीरा' म्हणत होते. नोराची गाणी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. 'झलक दिखला जा' या शोमध्ये सध्या नोरा दिसत आहे.