'चंद्रमुखीनंतर' अमृता खानविलकर झळकणार 'कलावती' सिनेमात; फर्स्ट लूक समोर

अमृता खानविलकरने चंद्रमुखी सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. आता अमृता खानविलकर कलावती सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Updated: Feb 27, 2023, 07:32 PM IST
'चंद्रमुखीनंतर' अमृता खानविलकर झळकणार 'कलावती'  सिनेमात; फर्स्ट लूक समोर title=

मुंबई : प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी सिनेमा  २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात अमृता खानविलकर चंद्राच्या भुमिकेत झळकली, आदिनाथ कोठारे खा. दौलतराव यांच्या भूमिकेत दिसला. या सिनेमाने बॉक्स ऑफिस चांगलच गाजवलं. या सिनेमासाठी अमृता खानविलरने बरीच मेहनत घेतली होती. आता अमृताच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. लवकरच अभिनेत्रीचा एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमृताचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 

गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या जॉनरचे  मराठी चित्रपट आपल्या भेटीस आलेले आपण पाहिले आहेत. प्रेक्षकांनी या सगळ्या चित्रपटांना चांगला प्रतिसादही दिला. आता मराठीतील अनेक उत्कृष्ट कलाकारांची टीम घेऊन रोमॅंटिक सिनेमांचे बादशहा संजय जाधव पहिल्यांदाच घेऊन येतायत हॉरर कॉमेडी जॉनरचा 'कलावती' चित्रपट घेऊन येत आहेत. 

'कलावती' हा बिग बजेट सिनेमा असून या सिनेमाने ओंकारला चांगली संधी मिळाली आहे. तर दुसरीकडे संजय जाधवचा सिनेमा जवळपास चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळेच एकंदरीतच या भव्य सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त सोहळा पार पडला असून लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येईल. 

मुंबईत आजीवासन स्टुडिओत या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा  २६ फेब्रुवारी,२०२३ रोजी संपन्न झाला.  चित्रपटातील कलाकारांसोबत इतर टीमनं देखील मुहूर्त सोहळ्यास उपस्थिती दर्शवली होती. चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्या दिवशीच प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजात चित्रपटातील पहिलं गाणं देखील रेकॉर्ड करण्यात आलं.

या सिनेमात अमृता खानविलकर,संजय नार्वेकर,तेजस्विनी लोणारी,अभिजित चव्हाण, हरीश दुधाडे,ओंकार भोजने, दिप्ती धोत्रे,संजय शेजवळ,नील साळेकर(इन्फ्लूएन्सर) अशी कलाकारांची तगडी टीम 'कलावती' या चित्रपटात दिसणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अमेय खोपकर एंटरटेन्मेंट, के.एफ. फिल्म्स लिमिटेड,ताहेर सिने टेक्निक्स आणि स्वाती खोपकर प्रस्तुत 'कलावती' चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी प्रजय कामत यांनी उचलली आहे.  तर सह-निर्माते म्हणून निनाद नंदकुमार बत्तिन,तबरेज पटेल,परीन मेहता,निश्चय मेहता, नवीन कोहली काम सांभाळणार आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x