Ankita Lokhande आणि Vicky Jain ची पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतची स्टोरी !

सणांबरोबरच सध्या कलाकारांची लगीनघाई देखील सुरु आहे. 

Updated: Nov 1, 2021, 07:51 PM IST
Ankita Lokhande आणि Vicky Jain ची पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतची स्टोरी ! title=

मुंबई : सणांबरोबरच सध्या कलाकारांची लगीनघाई देखील सुरु आहे. बॉलिवूडपासून टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. आता या यादीत टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेचेही नाव जोडले गेले आहे. ताज्या बातम्यांनुसार, अंकिता लोखंडे तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहे.

अंकिताच्या लग्नाची तयारीही सुरू झाली आहे. अंकिताची विक्की जैनसोबतची प्रेमकहाणी कशी सुरू झाली हे याबाबत अनेकांना माहित नसेल.

विकी जैनच्या आधी अंकिता लोखंडेचे सुशांत सिंग राजपूतसोबत खूप घट्ट प्रेमसंबंध होते. मात्र अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता खूपच तुटली होती. यादरम्यान अंकिताची विक्कीसोबत एका कॉमन फ्रेंडद्वारे भेट झाली.

यानंतर अंकिता आणि विकी दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवू लागले आणि दोघे चांगले मित्र बनले. विकीने अंकिताला खूप साथ दिली आणि तिला नैराश्यातून बाहेर काढायलाही मदत केली. हळूहळू अंकिता आणि विकी एकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 

2019 मध्ये विकी जैनने अंकिता लोखंडेला खूप रोमँटिक पद्धतीने प्रपोज केले होते. अंकिताने तिच्या एका सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. अंकिता आणि विकी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोघांचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर वर्चस्व गाजवतात.