म्हणून अक्षय कुमारच्या मुलाला बनायचं नाही अभिनेता; वडिलांनी केला खुलासा

अक्षय कुमारने 2001 मध्ये ट्विंकल खन्नासोबत लग्न केलं. 

Updated: Nov 12, 2022, 09:59 PM IST
म्हणून अक्षय कुमारच्या मुलाला बनायचं नाही अभिनेता; वडिलांनी केला खुलासा title=

Akshay Kumar Son : आपल्या एक्शनने प्रेक्षकांमध्ये खिलाडी कुमारची प्रतिमा निर्माण करणाऱ्या अक्षय कुमारच्या मुलाला अभिनयाची विशेष ओढ नाही. अक्षय कुमार हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे. अक्षय कुमारने मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

अक्षय त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. दरम्यान, हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारने त्याचा मुलगा आरवच्या अभिनयात रस असल्याबद्दल खुलासा केला आहे. चला जाणून घेऊया अक्षयने आणखी काय म्हटलं आहे.

अक्षय कुमारचा खुलासा
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय कुमारला त्याच्या मुलाबद्दल विचारण्यात आलं आणि अक्षयने उत्तर दिलं की त्याच्या मुलाला अभिनयात अजिबात रस नाही. यासोबतच अक्षयने मुलाखतीत असंही नमूद केलं की, त्याला त्याच्या मुलाला चित्रपट दाखवायचा आहेत आणि त्यांच्याबद्दल खूप काही सांगायचं आहे पण तो चित्रपटांमध्ये रस घेत नाही. आपलं बोलण पुढे चालू ठेवत अक्षयने पुढे सांगितलं की, त्याच्या मुलाला फक्त त्याच्या अभ्यासावर किंवा फॅशन डिझायनिंगसारख्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे.

अक्षयच्या मुलाखतीला प्रसिद्ध अभिनेता राम चरण देखील उपस्थित होता. राम चरणने अक्षयच्या मुलाबद्दल सांगितलं की, तो कदाचित इतर दिशांमध्ये करिअर शोधत असेल आणि हे लक्षात घेऊन त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं असावं. राम चरणची चर्चा संपताच अक्षय गमतीने म्हणाला की, कुणास ठाऊक, त्याला ब्रूस ली बनायचं आहे.

अक्षय कुमारने 2001 मध्ये ट्विंकल खन्नासोबत लग्न केलं. यानंतर अक्षयला आरव नावाचा मुलगा आणि नितारा नावाची मुलगी आहे. यावर्षी अक्षयचं अनेक चित्रपट प्रदर्शित झाले पण प्रेक्षकांचं जे प्रेम त्यांना नेहमीच मिळतं ते एकाही चित्रपटाला मिळालं नाही.