दोन वेळा या अभिनेत्रींना सोसावं लागलंय घटस्फोटाचं दु:ख, आता जगताय सुखी आयुष्य

इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्रींना घटस्फोटोचा सामना करावा लागलाय. पण काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांना तर 2 वेळा हे दु:ख सहन करावं लागलंय.

Updated: Nov 12, 2022, 09:46 PM IST
दोन वेळा या अभिनेत्रींना सोसावं लागलंय घटस्फोटाचं दु:ख, आता जगताय सुखी आयुष्य title=

मुंबई : अभिनेत्री चारू असोपा आणि राजीव सेन यांच्यातील नात्यात दुरावा आल्याची बातमी आली होती. चारूने राजीवसमोर घटस्फोटाची मागणी केली आहे. चारूला दुसऱ्यांदा हा धक्का बसलाय. राजीव सेनच्या आधी चारूचा 2016 मध्ये अभिनेता नीरज मालवीयसोबत साखरपुडा झाला होता. पण लग्नाआधीच त्यांचं नातं तुटलं होतं.
                  
श्वेता तिवारी : श्वेता तिवारी हे मनोरंजन क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. पण श्वेताला देखील 2 वेळा घटस्फोटाचा सामना करावा लागला आहे.  श्वेताचे पहिले लग्न 1998 मध्ये राजा चौधरीसोबत झाले होते. राजा चौधरीसोबत 9 वर्षे राहिल्यानंतर श्वेताने 2007 मध्ये त्याला घटस्फोट दिला.राजा चौधरीपासून वेगळे झाल्यानंतर श्वेताने अभिनव कोहलीसोबत विवाह केला. 2013 मध्ये लग्न झाले. पण दोघांमध्ये पुढे वाद होऊ लागले. त्यानंतर आज वयाच्या 42 व्या वर्षी श्वेता ही स्वतंत्र आयुष्य जगत आहे.

स्नेहा वाघ- अभिनेत्री स्नेहा वाघलाही घटस्फोटाचा त्रास सहन करावा लागला आहे.  अभिनेत्रीने अविष्कार दारवेकर यांच्याशी वयाच्या 19 व्या वर्षी लग्न केले, पण नंतर लग्न मोडले. पहिले लग्न तुटल्यानंतरही स्नेहाचा प्रेमावरील विश्वास कमी झाला नाही आणि तिने 2015 मध्ये अनुराग सोलंकीसोबत लग्न केले, परंतु अभिनेत्रीचे दुसरे लग्न देखील केवळ 8 महिने टिकले.

दीपशिखा नागपाली : दीपशिखाचे पहिले लग्न 1997 मध्ये अभिनेता जीत उपेंद्रसोबत झाले होते. जेव्हा त्यांच्या वैवाहिक जीवनात भांडणे वाढू लागली तेव्हा दोघांनी घटस्फोट घेतल्यानंतर 2007 मध्ये वेगळे होण्याची घोषणा केली. दीपशिखाने 2012 मध्ये कैशव अरोरासोबत लग्न केले, पण अभिनेत्रीचे दुसरे लग्नही अयशस्वी ठरले.