Advocate Gunratna Sadavarte : छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस' या शोकडे सगळे वादग्रस्त शो म्हणून पाहतात. गेल्या काही दिवसांपासून हिंदी 'बिग बॉस'च्या आगामी पर्वाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतीक्षा करत होते. यंदाचं 'बिग बॉसचं 18' वं पर्व आहे. 'बिग बॉस 18' व्या पर्वात कोण कोण दिसणार यावरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्या सगळ्यात आता पहिल्या स्पर्धकाचं नावं समोर आलं आहे. तो स्पर्धक दुसरा कोणी नसून वकिल गुणरत्न सदावर्ते आहेत.
गुणरत्न सदावर्ते यांनी स्वत: या विषयी घोषणा केली आहे. त्यामुळे आता या कार्यक्रमात एक वेगळीच रंगत पाहायला मिळणार आहे असं सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. त्यांच्यात सध्या चर्चा सुरु असताना आणखी कोणते कलाकारा पाहायला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
गुणरत्न सदावर्ते यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांनी एसटी कामगारांच्या संपात सहभागी होऊन स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गुणरत्न सदावर्ते हे नेहमीच कायद्याची भाषा आणि ओरडून बोलण्याच्या त्यांच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असतात. त्यात काही दिवसांपूर्वी त्यांनी एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी 'बिग बॉस हिंदी'ची ऑफर दिली याविषयी सांगितलं होतं. बिग बॉसच्या ऑफरविषयी बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, 'बिग बॉस हिंदीसाठी माझ्याकडे दोन महिने लोकं फेऱ्या घालत होते. त्यांचा प्रोडक्शन मॅनेजर दोन महिने अॅग्रीमेंट घेऊन फेऱ्या घालत होता, अशी माहितीच त्यांनी दिली. तसेच, जेनला खतरों के खिलाडी हिंदीसाठी विचारण्यात आले होते. त्या लोकांनी सहा महिने वाट पाहिली. आमचं जीवन हे खूप व्यस्त आहे. फिल्मी जीवनासाठी आमचा जन्म झालेला नाही. गरजवंतांना मदत करण्यासाठी आमचा जन्म झाला आहे.'
हेही वाचा : ...म्हणून मी 'पुष्पा'ला दिला नकार! अल्लू अर्जूनचं नाव घेत स्टेजवरुनच शाहरुख खानचा खुलासा
गुणरत्न सदावर्ते यांच्या आधी बिग बॉस हिंदीमध्ये अभिजीत बिचुकले दिसले होते. त्यावेळी अभिजीत बिचुकलेनं सगळ्यांचे लक्ष वेधले होते. सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे अभिजीत बिचुकलेला बिग बॉसच्या घरातून पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे तो चर्चेत आला होता. अशात आता गुणरत्न सदावर्ते हे कोणत्या कारणासाठी चर्चेत येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.