कंगनाला आदित्यची पत्नी झरीना वहाबचं सडेतोड उत्तर

आदित्य पांचोली आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात सुरू असलेल्या वादात आता पहिल्यांदाच आदित्यची पत्नी झरीना वहाब यांनी वक्तव्य केलं आहे.

Updated: Sep 11, 2017, 04:17 PM IST
कंगनाला आदित्यची पत्नी झरीना वहाबचं सडेतोड उत्तर title=

मुंबई : आदित्य पांचोली आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात सुरू असलेल्या वादात आता पहिल्यांदाच आदित्यची पत्नी झरीना वहाब यांनी वक्तव्य केलं आहे.

पिंकविला या वेबसाईटसोबत बोलताना झरीना यांनी कंगनाचे आरोप खोटे असल्याचा दावा केलाय. 

झरीना म्हणाली की, कंगनाला मुलगी मानण्याची बाब खोटी आहे. मी माझ्या पतीच्या एक्स गर्लफ्रेन्डला मुलगी कशी मानू शकते. कंगनाने वेगवेगळ्या चॅनेल्सवर केलेल्या वक्तव्याने झरीना वहाब यांना फारच दु:ख झालं आहे. 
 
त्या म्हणाल्या की, मी माझी पर्सनल लाईफ माझ्या बहिणींसोबत शेअर करत नाही तर कंगना कोण आहे? तसेच, त्या म्हणाल्या की, त्या कंगनाला फार कमी वेळ भेटल्या आणि जेव्हा जेव्हा भेटल्या तेव्हा आदित्यच्या सांगण्यावरून भेटल्या. 
 
झरीना म्हणाल्या की, ‘कंगना आज करिअरच्या चांगल्या शिखरावर आहे. तिने विचार करून वक्तव्य केलं पाहिजे. पण कंगना ही तसं करण्याचं सोडून इंडस्ट्रीतील तिच्या पोझिशनचा चुकीचा वापर करत आहे. 
 
दरम्यान, स्पॉटबॉय.कॉम या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सूरज पांचोली म्हणाला की, तो काळ त्याच्या परिवारासाठी कठिण होता. पण त्यावेळी तो १५ वर्षांचा होता म्हणून त्याला याबाबत जास्त माहिती नाही.