Shocking !! अदा शर्माच्या फॅनने सगळ्यांसमोर मागितला किस

अनेकदा आपण ऐकलं असेल की जबरा फॅन्समुळे कलाकारांना भरपूर त्रास सहन करावा लागतो. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 5, 2017, 06:05 PM IST
Shocking !! अदा शर्माच्या फॅनने सगळ्यांसमोर मागितला किस  title=

अनेकदा आपण ऐकलं असेल की जबरा फॅन्समुळे कलाकारांना भरपूर त्रास सहन करावा लागतो. 

मुंबई : फॅन्सच्या नकोत्या मागणीमुळे सेलिब्रिटी हैराण झाल्याचे आपण पाहिले आहे. असाच एक प्रकार अभिनेत्री अदा शर्मासोबत घडला आहे. 

अदा नुकतीच एका मीडिया इव्हेंटला गेली होती. तेव्हा चक्क एका फॅनने अदा शर्माकडे नको ती मागणी केली. त्या फॅनने अदा शर्माला आपल्या गालावर किस करण्याची मागणी केली. अदाने लगेच त्या चाहत्याला नकार दिला. यानंतर त्या चाहत्याने काहींच्या मदतीने अदा शर्माला ट्विटरवर ट्रोल करण्यास सुरूवात केली. तिला टार्गेट करत अनेक उलट सुलट चर्चा देखील रंगल्या. तसेच कमांडो २ या सिनेमात अदा शर्माने भरपूर मोठा किस केल्याची चर्चा आहे तर मग एका फॅनला किस करण्यासाठी अदा का नकार देते? असा देखील सवाल विचारला जात आहे. 

या चाहत्याच्या वक्तव्यावर अदा शर्मा भडकली असून तिने ट्विटरवर एकापाठोपाठ अनेक ट्विट केले आणि ट्रोलरला प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली की, गेल्या तीन वर्षात मी कधीच ट्विटरवर आपला असा राग व्यक्त केलेला नाही मात्र मला त्रास देण्यात आलेला आहे. मी किस देण्यास नकार दिल्यामुळे मला सगळ्यांसमोर टार्गेट केलं जातं. 

तिने म्हटलंय की, माझ्यासाठी किस काही हार्मलेस नाही. तू म्हणतोस की किस करण्यात काय प्रश्न आहे. पण तू कोण होतोस हे सांगणारा की, माझ्यासाठी कोणती गोष्ट लहान आहे आणि कोणती गोष्ट मोठी आहे. हा माझा निर्णय आहे की मी कुणाला किस करायचं आणि कुणाला नाही.