Uri चित्रपटाचा किस्सा सांगताना यामी गौतमीने सांगितली बॉलीवूडची 'ती' काळी बाजू

 'उरी' हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतला टर्निंग पॉइंट ठरला. 

Updated: Jul 24, 2022, 08:09 PM IST
Uri चित्रपटाचा किस्सा सांगताना यामी गौतमीने सांगितली बॉलीवूडची 'ती' काळी बाजू title=

Yami Gautam : बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमीने बॉलीवूडमध्ये नुकतीच 10 वर्षे पूर्ण केली आहेत. यादरम्यान तिने अनेक सुपरहिट चित्रपट केले. पण 'उरी' हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतला टर्निंग पॉइंट ठरला. ज्याचे श्रेय ती पती आदित्य धार यांना देते. जेव्हा संपूर्ण इंडस्ट्री तिला टाइपकास्ट करत होती तेव्हा आदित्यने तिच्या करिअरला नवीन दिशा मिळवून दिली, असा खुलासा नुकत्याच यामीने दिलेल्या एका मुलाखतीतून केला आहे. 

एका मुलाखतीत तिने म्हटले आहे की, ''बॉलीवूडमध्ये खूप टाईपकास्ट केले जाते. एक भुमिका केली की त्याच पद्धतीच्याच भुमिका ऑफर केल्या जातात तशा मलाही केल्या गेल्या. 'विकी डोनर'सारख्या सुपरहिट चित्रपटात काम करूनही चित्रपटसृष्टीने माझ्या अभिनय क्षमतेकडे अनेक वर्षे दुर्लक्ष केले. पण त्याच दरम्यान आदित्य धारने 'उरी' हा चित्रपट ऑफर केला आणि प्रेक्षकांना माझा वेगळा अभिनयही पाहता आला. 

यामी गौतमने खुलासा केला की, ''माझ्या चित्रपटांच्या निवडीबाबत मी अनेकदा माझ्या मित्रांचा आणि पती यांचा सल्ला घेते. मला वाटते की यामुळे मला माझ्या चित्रपटांच्या निवडीबाबत चांगले निर्णय घेता येतात. आदित्य मला कधीच सल्ला देत नाही उलट आम्ही एकत्र चर्चा करतो. आदित्य एक उत्तम दिग्दर्शक आहे आणि त्याची चित्रपटांबद्दलची विचारसरणी इतरांपेक्षा वेगळी आहे. आदित्यने मला 'उरी' चित्रपटात अशा वेळी कास्ट केले जेव्हा संपूर्ण इंडस्ट्रीला असे वाटले की मी फक्त एकाच प्रकारची व्यक्तिरेखा साकारण्यास सक्षम आहे.", असा अनुभव यामीने सांगितला. 

पुढे यामी म्हणाली, 'आदित्य अशा मोजक्या दिग्दर्शकांपैकी एक आहे ज्यांच्याकडे स्वतःच्या मर्यादा तोडून काहीतरी नवीन करण्याची क्षमता आहे. मला आनंद आहे की तो माझा पती आहे. तो मला आणि माझ्या करिअरला चांगल्या प्रकारे समजून घेतो.''

'उरी; चित्रपटानंतर यामी गौतम आणि आदित्य धार यांच्यात जवळीक वाढली होती त्यानंतर दोघांनी लग्न करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.