सिनेमात ब्रेक मिळताच या ७ अभिनेत्रींनी अर्धवट सोडले शिक्षण!

शिक्षणापेक्षा कला, अभिनय याला बॉलिवूडमध्ये अधिक महत्त्व आहे.

Updated: May 18, 2018, 02:53 PM IST
सिनेमात ब्रेक मिळताच या ७ अभिनेत्रींनी अर्धवट सोडले शिक्षण! title=

मुंबई : शिक्षणापेक्षा कला, अभिनय याला बॉलिवूडमध्ये अधिक महत्त्व आहे. आणि ते अगदी स्वाभाविकही आहे. त्यामुळे सिनेसृष्टीत उच्च शिक्षित कलाकार काहीसे कमी आहेत. कारण एकदा सिनेमात ब्रेक मिळाल्यानंतर पुढे शिक्षण घेणे काहीसे कठीण होते. बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी सिनेसृष्टीतील करिअरसाठी शिक्षण अर्धवट सोडले. बॉलिवूडच्या या ७ टॉप अभिनेत्रींनी सिनेमात ब्रेक मिळताच शिक्षण अर्धवट सोडले. 

प्रियंका चोप्रा

बॉलिवूड नव्हे तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी देसी गर्ल प्रियंका चोप्राने मुंबईतील जय हिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. पण २००० मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर तिने शिक्षण सोडून अभिनयात करिअर करण्याचे ठरवले.

बराक ओबामा भेटीनंतर प्रियंका चोप्रा पाहा काय म्हणाली?

सोनम कपूर

कॉलेजमध्ये प्रवेश घेतला असताना २००५ मध्ये संजय लीला भन्सालींनी तिला असिस्टेंट म्हणून निवडले. ही हातची संधी जावू नये म्हणून तिने शिक्षणावर पाणी सोडत अभिनयात करिअर करण्यास सुरुवात केली.

सोनम कपूर 8 मेला आनंद अहुजासोबत अडकणार विवाहबंधनात

आलिया भट्ट

शाळा संपल्यानंतर लगेचच तिला सिनेमात ब्रेक मिळाला. त्यामुळे त्यातच करिअर सुरु राहीले आणि कॉलेजला जाण्याचा प्रश्नचा आला नाही.

'ब्रम्हास्त्र' च्या सेटवर आलिया भट्ट जखमी

करिना कपूर

शाळा संपल्यानंतर कॉमर्स आणि मग कायद्याचा अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या करिनाला २००० मध्ये रिफ्यूजी सिनेमात ब्रेक मिळाला. त्यानंतर शिक्षण सोडत तिने सिनेसृष्टीत करिअर करण्याचे ठरवले.

OMG...नणंदेच्या Book Launch Eventमध्ये ५.४ लाखांचा ड्रेस घालून आली करीना

दीपिका पदुकोण

सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत असलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण. शाळेनंतर तिने इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिवर्सिटीत मानसशास्त्राचा अभ्यास करत होती. मात्र २००७ मध्ये ओम शांती ओम सिनेमात शाहरुखसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि तिने शिक्षणाला रामराम ठोकला.

दीपिका पदुकोण TIME-100 या पॉवरफुल लोकांच्या लिस्टमध्ये सहभागी

कतरिना कैफ

बॉलिवूडमधील या हिट अभिनेत्रीचे सत्य तुम्हाला ठाऊक नाही. खरंतर सातत्याने घर बदलल्याने तिला शाळेय शिक्षणही नीट पूर्ण करता आले नाही. त्यानंतर १४ व्या वर्षापासूनच तिने मॉडलिंग करण्यास सुरुवात केली.

अन् जेव्हा कतरिना कैफ गल्ली क्रिकेट खेळते.........

ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्याने १२ वी नंतर आर्किटेक्चर अॅकडमीत प्रवेश घेतला होता. मात्र मॉडलिंग करायला सुरुवात केल्यानंतर तिने शिक्षण अर्धवट सोडून दिले.

ऐश्वर्या राय-बच्चन 'बादशाहो'मध्ये महाराणीच्या भूमिकेत