अद्याप लग्न न करण्याबाबत काय म्हणाली तब्बू?

काय म्हणाली तब्बू?

अद्याप लग्न न करण्याबाबत काय म्हणाली तब्बू? title=

मुंबई : अखेर अभिनेत्री तब्बूने लग्न न करण्याच्या मुद्यावर मौन सोडलं आहे. एका कार्यक्रमात तब्बूला तू अजून लग्न का केलं नाही असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तब्बूने एक लांब श्वास घेतला. आणि म्हटलं की, अद्याप लग्न न केल्यामुळे मला कोणताच पश्चाताप नाही. मकबूल, चांदनी बार, चीनी कम आणि हैदर सारख्या सिनेमांत काम करणाऱ्या या अभिनेत्रीने आपली वेगळी ओळख निर्माण केली. 

वयात आलेल्या मुलीने लग्न न करणं हा आपल्या भारतातील मोठा गहण प्रश्न आहे. मग यातून अभिनेत्री तरी कशी सुटेल. 46 वर्षीय तब्बूने हो... मी सिंगल आहे. पुढे प्रश्न विचारा असा प्रश्न चाहत्यांना केला. ती म्हणाली की, मी सिंगल असल्यामुळे खूप चांगल काम करू शकले. 

अब रियलिटी शो में काम करना चाहती हैं तब्बू, कहा- 'मुझे इसमें दिलचस्पी है'

पुढे तब्बू म्हणाली की, मला लग्नाचा अनुभव नाही. त्यामुळे त्या दुसऱ्या बाजूबद्दल काहीच बोलू शकत नाही. लग्न केलेलं योग्य आहे की लग्न न केलेलं योग्य. जेव्हा मी या सगळ्याचा अनुभव घेईन तेव्हाच काही तरी सांगू शकेन. मी कधी लग्न केलं नाही त्यामुळे लग्नाचा अनुभव काय असतो हे मी सांगू शकत नाही.