'बॉयफ्रेंडला दुसरी मुलगी आवडत असेल तर...' Ditching वर सुहानाचं स्पष्ट मत

Suhana Khan Views on Boyfriend : सुहाना खानचा नवा चित्रपट हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तिनं एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे तिला जर का डचिंगचा अनुभव आला तर ती काय करेल यावर तिनं भाष्य केले आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 30, 2023, 05:42 PM IST
'बॉयफ्रेंडला दुसरी मुलगी आवडत असेल तर...' Ditching वर सुहानाचं स्पष्ट मत title=
actress suhana khan explains on if her boyfriend ditches her what she may do

Suhana Khan on Ditching in Relationship: सध्या चर्चा आहे की म्हणजे सुहाना खान हिची. तिचा पहिला वहिला चित्रपट 'द आर्चिज' हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कालच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी या चित्रपटाची संपुर्ण टीमनं व्होगच्या फीचरवर झळकली. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. यावेळी सुहाना खाननं आपल्या वैयक्तिक आयुष्यावरही खुलासा केला आहे.

द 'आर्चिज'मधील वेरोनिका भुमिका तरी करताना दिसते आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. आर्ची या पात्रावर वेरोनिका आणि बेटी या दोन मुली भुललेल्या असतात. त्यामुळे खरं म्हणजे आर्चीजच्या या दोन गर्लफ्रेंड्स असतात आणि या तिघांमध्ये लव्ह ट्रॅगल असते. तेव्हा आपल्या याच पात्राला अनुसरून तिला एक प्रश्न विचारण्यात आला होता. 

तिचं पात्रं हे बोल्ड आणि बिनधास्त आहे. तिच्या पात्राचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला होता तेव्हा वेरोनिकाच्या मुलांच्या मागे लागत नाही तर मुलं वेरोनिकाच्या मागे लागतात असा म्हटलं गेले होते. त्यामुळे ती यावेळी आपल्या वेगळ्या भुमिकेतून दिसणार आहे हे खरे. यावेळी तिनं व्होगला दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. जर का बॉयफ्रेंडनं तिची फसवणुक केली तर ती काय करेल. यावेळी ती म्हणाली की, ''जर माझ्या बॉयफ्रेंडने असं केलं तर मी त्याला सोडेन. कारण मला ‘वन वुमन मॅन’ आवडतात. गर्लफ्रेंड असूनही दुसऱ्या मुलीशी बोलणाऱ्या मुलाशी नातं पुढे न्यायला मी तयार होणार नाही, मला ते अजिबातच आवडणार नाही.”, असं ती यावेळी म्हणाली आहे. 

हेही वाचा : 'एकाच इंडस्ट्रीत आहोत म्हणून गळ्यात गळे...' सईसोबतच्या मैत्रीवर प्रश्न विचारताच चंद्रा काय म्हणाली

2022 मध्ये सुहानाच्या 'द आर्चिज' या चित्रपटाची घोषणा झाली. त्यानंतर या चित्रपटाचे पहिले पोस्टर मग त्याचा पहिला लुक आणि आता रिलिज डेटही प्रदर्शित झाली आहे. त्यामुळे सुहाना खानची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. यावेळी या चित्रपटातून तीन स्टार कीड्स एकत्र येणार असल्यानं या तिघांनाही फार ट्रोल केले होते. त्यांना फार मोठ्या प्रमाणात हिणवलं गेले होते. मल्टिवर्स ऑफ नेपोटिझम अशा प्रकारे त्यांच्यावर टीका करण्यात आळी होती.