मुंबई : 'छिछोरे' आणि 'साहो' हे सुपरहिट चित्रपट देणारी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या काही वर्षांपासून आजाराने त्रस्त आहे. खुद्द श्रद्धा कपूरनेच याबाबत खुलासा केला आहे. नुकतंच, 'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत श्रद्धाने ती गेल्या ६ वर्षांपासून Anxiety मुळे त्रस्त असल्याचं सांगितलंय.
मुलाखती दरम्यान तिने सांगितलं की, मला माहितच नव्हतं की, एंग्जायटी काय असतं. मला याबाबत काहीही कल्पना नव्हती. 'आशिकी २' चित्रपटानंतर मला हा त्रास व्हायला लागला. मला त्रास होत होता, अनेक टेस्ट करुनही काहीच समोर आलं नाही. पण एक गोष्ट खूप विचित्र वाटत होती की, टेस्टमध्ये काहीही आढळून आलं नसलं, तरी मला अतिशय त्रास होत होता, त्याबाबत कारणही समजंत नसल्याचं तिने सांगितलं.
'आजही मला हा त्रास आहे. पण आता मी यापासून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला आहे. आपल्याला याचा स्वीकार करावाच लागतो की, आपण याचा एक भाग आहोत आणि या गोष्टीला आपल्याला प्रेमानेच हाताळावं लागतं. हाच मोठा फरक आहे' असं ती म्हणाली.
श्रद्धाचे सध्या प्रदर्शित झालेले 'साहो' आणि 'छिछोरे' चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. श्रद्धा आगामी स्ट्रीट डांसर आणि बागी ३ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.