''बीचवर बिकीनी घालणं कॉमन नाही का?...''; सीतेची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा बोचरा सवाल

Shivya Pathania Trolled on Wearing Bikini on Beach: सोज्वळ आणि संस्कारी भुमिका करणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्री जेव्हा हॉट आणि बोल्ड फोटोज सोशल मीडियावर शेअर करतात तेव्हा त्या मोठ्या प्रमाणात ट्रोलही होतात. सध्या असंच काहीतरी अभिनेत्री शिव्या पठानियाच्या बाबतीत घडलं आहे. त्यावर खुद्द अभिनेत्रीनंही प्रतिक्रिया दिली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 1, 2023, 12:34 PM IST
''बीचवर बिकीनी घालणं कॉमन नाही का?...''; सीतेची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा बोचरा सवाल title=
(Photo : Shiya Pathania | Instagram)

Shivya Pathania Trolled: आता सोशल मीडिया अनेक लोकप्रिय सेलिब्रेटी या चांगल्या सक्रिय असतात त्या त्यांचे हॉट आणि बोल्ड फोटोजही सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्यावर अनेकदा तिखट प्रतिक्रियाही येताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या फोटोंची बरीच चर्चा रंगलेली असते. बॉलिवूड सेलिब्रेटींच्या बाबतीतही (Trolling) अनेकदा त्यांना त्यांच्या बोल्ड लुकसाठी ट्रोल केले जाते. दिशा पटानी ही अभिनेत्री कायमच आपल्या बोल्ड लुकसाठी चर्चेत असते त्यामुळे तिच्याही बऱ्याचदा चर्चा होताना दिसतात. तिलाही मध्यंतरी तिच्या बोल्ड लुकमुळे ट्रोल करण्यात आले होते. काही दिवसांपुर्वी तिला तिच्या रिव्हिलिंग ड्रेससाठी ट्रोल करण्यात आले होते. त्यामुळे तिला नेटकऱ्यांकडून तिखट प्रतिक्रिया येयला लागल्या होत्या. 

बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे आता टेलिव्हिजन अभिनेत्रीही कायमच त्यांच्या बोल्ड लुक्ससाठी ओळखल्या जातात. त्याही बोल्डनेसच्या बाबतीत कमी नाही. त्यामुळे त्यांच्याही कायमच चर्चा या रंगलेल्या असतात. सध्या अशीच एक अभिनेत्री चर्चेत आहे जिचं नावं आहे शिव्या पठानिया. शिव्या हिनं 'बाल शिव' आणि 'राम सिया के लव कुश' अशा मालिकांमधून अनुक्रमे पार्वती आणि सीतेची भुमिका केली होती. त्याचसोबत तिनं 'राधाकृष्ण' या मालिकेतून राधाचीही भुमिका साकारली होती. तिच्या या मालिकांमधील भुमिका प्रचंड गाजल्या. या मालिकेनंतर तिचा स्वत:चा असा वेगळा असा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

परंतु यावेळी तिनं तिचे बिकीनीतले फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामुळे ती प्रचंड प्रमाणात ट्रोल झाली आहे. पार्वती, सीता, राधा यांच्या भुमिका छोट्या पडद्यावर करणाऱ्या या अभिनेत्रीचे बिकीनीतले फोटोज पाहून चाहते भडकले आहेत. परंतु एका मुलाखतीतून मात्र तिनं या ट्रोलिंगवर आपली प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. यावेळी ती नक्की काय म्हणाली याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे असेलच. 

हेही वाचा - ....आणि दाक्षिणात्य R. Madhavan कोल्हापुरच्या लेकिच्या प्रेमात पडला; अशी होती Love Story

का केलं ट्रोलिंग? 

सीता, राधा आणि पार्वतीसारख्या पवित्र, संस्कारी भुमिका रूपेरी पडद्यावर केल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. परंतु ती शेअर केलेले बिकीनी फोटो हे इन्टाग्रामवर एवढे व्हायरल झाले की त्यामुळे ती प्रचंड प्रमाणात ट्रोल झाली. ''तू हे शोभत का'', ''हेच का तुझे संस्कार'', ''तू लाज नाही का वाटतं'', अशा तिखट शब्दांमध्ये नेटकऱ्यांनी तिची शाळा घेतली होती. 

अभिनेत्रीची प्रतिक्रिया 

आपल्या बिकीनीवरून ट्रोल झाल्यानंतर शिव्यानं एक इन्टाग्राम पोस्ट शेअर केली होती आता ती ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत यावरही भाष्य केले आहे. ती म्हणाली, ''मी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय करते आहे. आणि लोक माझ्या भुमिकांसाठी माझ्याशी खूप चांगल्या प्रकारे जोडले गेले आहेत. मी स्वत: स्टायलिश कपडेही परिधान करणारी मुलही आहे. लहानपणापासूनच मला फॅशन, मेकअप यांसारख्या गोष्टींची आवड आहे. जेव्हा मी काही दिवसांपुर्वी माझे बिकीनीतले फोटो पोस्ट केले तेव्हा मला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. काहींनी माझ्यावर नकारात्मक कमेंट्स केल्या तर काहींनी माझ्या या फोटोंवर सकारात्मक कमेंट्सही केल्या आहेत.'' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

''अनेकांनी मला अशाप्रकारे कपडे न घालण्याचा सल्ला दिला. मी आता कोणते कपडे परिधान करावेत यावर ते सल्ले देऊ लागले आहेत. बीचवर बिकीनी घालणं सर्वसामान्य नाही का? मी सर्वांच्या मतांचा आदर करते मात्र मी हे सांगून इच्छिते की माझ्या कपड्यांवरून माझी ओळख होत नाही. सोशल मीडियावर मी जशी खरी आहे तशी आहे. पण कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी मी घेईन.''