नवख्या अभिनेत्रीचं स्वप्न पूर्ण, 22 व्या वर्षी खरेदी केली 80 लाखांची महागडी वस्तू

 स्वप्नांच्या नगरीमध्ये अनेकांचे स्वप्न पूर्ण होतात. वयाच्या 22 व्या वर्षी अभिनेत्रीचं स्वप्न देखील पूर्ण   

Updated: Mar 23, 2022, 11:40 AM IST
नवख्या अभिनेत्रीचं स्वप्न पूर्ण, 22 व्या वर्षी खरेदी केली 80 लाखांची महागडी वस्तू title=

मुंबई : स्वप्नांच्या नगरीमध्ये अनेकांचे स्वप्न पूर्ण होतात. अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरने देखील तिचं स्वप्न पूर्ण केलं आहेत. शनायाने नवी कार खरेदी केली आहे. शनायाने खरेदी केलेल्या कारचं नाव ऑडी क्यू 7 असं आहे. शनायाच्या नव्या कारचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

शनायाने काळ्या रंगाची ऑडी Q7 फेसलिफ्ट खरेदी केली आहे. या कारची किंमत 80 लाख रुपये आहे. या कारचे दोन प्रकार आहेत. ज्यांची किंमत जवळपास  80 ते 88 लाख रुपये आहे. 

शनायाने  ब्लॅक प्रीमियम मॉडेल खरेदी केलं आहे, ज्याची किंमत 80 लाख रुपये असल्याचं समोर येत आहे. शनायाबद्दल सांगायचं झाल तर, ती लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

करण जोहर शनाया कपूरला बॉलिवूडमध्ये संधी देणार आहे. अभिनेता संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. यावर्षी शनाया एका मोठ्या सिनेमात दिसू शकते. 

 
करण जोहरनं धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली, शनाया कपूरला लाँच केल्याची घोषणा केल्यानंतर आता या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. 'बेधडक' सिनेमातून शनाया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

शनाया शिवाय दोन अभिनेते बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शनाया कपूर, लक्ष्य आणि गुरफतेह परजादा तिघे 'बेधडक' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्याच्या भेटीस येणार आहेत.