Richa Chaddha and Ali Fazal: बॉलिवूड स्टार रिचा चढ्ढा आणि अली फजल यांचा विवाहसोहळा नुकताच संपन्न झाला आहे. (Richa Chadha and Ali Fazal) अनेक वर्षे डेटिंग आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आता हे दोघे कायमचे एकमेकांचे झाले आहेत. या स्टार जोडप्याच्या भव्य लग्नाचे सर्व फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत जे खूप व्हायरलही झाले आहेत. (Richa Chadha and Ali Fazal Marriage Photos) आता रिसेप्शननंतर या जोडप्याने त्यांच्या चाहत्यांसाठी एक खास गोष्ट केली आहे.
रिसेप्शननंतर हे नवं विवाहित जोडपं फोटोग्राफर्सना पोज देण्यासाठी कार्यक्रमस्थळाच्या बाहेर आले आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या हातांनी भेटवस्तूंचे वाटप केले. मीडियाला आणि त्यांच्यासाठी जमलेल्या त्यांच्या चाहत्यांना त्यांनी स्वहस्ते गिफ्ट्स दिले. रिचा आणि अलीची ही स्टाईल त्यांच्या चाहत्यांना खुप आवडली. सोशल मीडियावर लग्न झालेल्या या जोडप्यावर अनेकांनी प्रेमाचा वर्षावही केला आहे. (Richa Chadha and Ali Fazal Viral Video)
आणखी वाचा - प्रेग्नंट आलियाला त्यानं Kiss केलं तेव्हा... घरचे झाले शॉक!
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रिचा आणि अलीने त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमातील काही अनसीन फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केले. कॉकटेल पार्टी-संगीतापासून लग्न आणि रिसेप्शनपर्यंत, अली-रिचा प्रत्येक लूकमध्ये अतिशय रॉयल आणि सुंदर दिसत होते आणि दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद या फोटोंतून चांगलाच स्पष्ट होत होता. अलीनं नुकतेच त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Ali Fazal Instagram Post)
अली फजलने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एका नवीन पोस्टमध्ये आपल्या चाहत्यांचे आणि मित्रांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी त्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले की, 'आम्ही दोघेही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की तुम्ही सर्वजण आमच्या आनंदात सामील झाला आहात. आमच्या सर्व मित्रांचे आणि जे तिथे उपस्थित राहू शकले नव्हते त्यांचेही खूप खूप आभार. आम्ही तुमच्या सर्वांवर खूप प्रेम करतो. आमच्यासाठी संपूर्ण आठवडा रोल कोस्टर राईडसारखा होता जिथे आम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांसह आनंद साजरा करायचा होता, अशी भावना अलीनं व्यक्त केली आहे.