'या' अभिनेत्रीला शुटिंगदरम्यान घ्याव्या लागल्या गर्भनिरोधक गोळ्या, स्वत: दिली माहिती

चाहत्यांना आपल्या आवडत्या सेलिब्रिटी आणि त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला फारच आवडते. यासाठी ते सोशल मीडियाचा पर्यायांकडे वळतात.

Updated: Mar 9, 2022, 10:03 PM IST
'या' अभिनेत्रीला शुटिंगदरम्यान घ्याव्या लागल्या गर्भनिरोधक गोळ्या, स्वत: दिली माहिती title=

मुंबई : चाहत्यांना आपल्या आवडत्या सेलिब्रिटिं आणि त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला फारच आवडते. यासाठी ते सोशल मीडियाचा पर्याय वापरतात. हल्ली सेलिब्रिटी देखील आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा पर्याय निवडतात. ज्याद्वारे चाहत्यांना त्यांच्याबद्दल माहिती मिळते. सध्या सोशल मीडियावर एका बातमीनं धुमाकुळ घातला आहे. ज्यामध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं स्वत: वक्तव्य केलं आहे की, तिला सिनेमा शुटिंगच्या वेळेला गर्भनिरोधक गोळ्या घ्याव्या लागल्या होता. आता स्वत: अभिनेत्रीनं असं खळबळजनक वक्तव्य केल्यानंतर चर्चा तर होणारच.

'पटाखा', 'शद्दत' आणि 'हिंदी मीडियम' यांसारख्या चित्रपटातून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी राधिका मदन आता बॉलिवू़डमधील एक ओळखीचा चेहरा झाली आहे आणि राधिकानेच असं वक्तव्य केल्यानंतर तिच्या चाहत्यांना आणि सोशल मीडियावरील लोकांना धक्का बसला आहे.

टीव्हीवरून करिअरची सुरुवात करणारी राधिका आज बॉलिवूडमध्ये सतत हिट चित्रपट देत आहे. परंतु राधिकाला तिच्या करिअरच्या पहिल्याच दिवशी शूटिंगमध्ये गर्भनिरोधक गोळ्या खाव्या लागल्या आहेत.

गर्भनिरोधक गोळ्या विकत घेतल्या

राधिका मदानने 'शिद्दत' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, करिअरच्या सुरुवातीला तिला खूप संघर्ष करावा लागला. त्यावेळी तिने तिच्या पहिल्या सिनेमाच्या वेळी घडलेल्या त्या किस्स्याबद्दल सगळ्यांना सांगितले.

खरेतर राधिकाने त्या गोळ्या खाल्ल्या नव्हत्या तर, तिने शुटिंगसाठी त्या विकत घेतल्या होत्या.

राधिका म्हणाली, 'माझा शूटिंगचा पहिला दिवस होता आणि मी माझ्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी गर्भनिरोधक गोळी खरेदी केली होती. तिने सांगितले की, जेव्हा दिग्दर्शकाने तिला गर्भनिरोधक गोळी घेण्यास सांगितले तेव्हा तिला थोडे आश्चर्य वाटले. परंतु तो माझा पहिला शॉट होता. ज्यामुळे मी तो चांगल्यारितीने पार पाडला.'

राधिका मदनने पुढे सांगितले की, 'त्यावेळी माझे पालक मला सरप्राईज देण्यासाठी माझ्या घरी पोहोचले होते. त्याला पाहून मला आनंद झाला, पण जेव्हा त्यांनी या गोळ्या घरात दिसल्या तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. राधिकाने सांगितले की, तिच्या वडिलांनी आश्चर्याने औषधांकडे पाहिले पण त्यांनी तिला काहीच विचारले नाही.'

राधिका म्हणाली की, त्यावेळी ती खूप घबरली होती. परंतु घरच्यांनी त्याबाबत चर्चा केली नाही म्हणून मग तिच्याही जीवात जीव आला.

राधिका मदनला 'पटाखा' आणि 'मर्द को दर्द नहीं होता' चित्रपटातून ओळख मिळाली. पण राधिकाने इरफान खानच्या शेवटचा चित्रपट 'हिंदी मीडियम'मध्ये त्याची ऑन-स्क्रीन मुलगी बनून लोकांची मनं जिंकली आहे.