'या' चित्रपटातून अभिनेत्री प्रिया बेर्डे करणार कमबॅक

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यानी आजवर अनेक चित्रपट,मालिकांमधून आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप त्यांनी उमटवली आहे. मात्र लवकरच ही अभिनेत्री कमबॅक करणार आहे.

Updated: Feb 21, 2024, 12:57 PM IST
'या' चित्रपटातून अभिनेत्री प्रिया बेर्डे करणार कमबॅक title=

मुंबई : आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून  "भिशी मित्र मंडळ" या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. नुकतेच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुणे येथे सुरुवात झाली असून त्यामध्ये आता अजुन एका    अभिनेत्रीची वर्णी लागली आहे आणि त्या अभिनेत्री म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे.

अमोल कागणे आणि शरद पाटील हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत तर किरण कुमावत, लक्ष्मण कागणे, विनया मोरे, अजिंक्य जाधव, अक्षय बोडके आणि गौरी पाठक हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सागर पाठक लिखित, सुमित संघमित्र दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण आता लवकरच पुणे येथे सुरु होणार असून संजीवकुमर चंद्रकांत हिल्ली ये सिनेमाटोग्राफर म्हणून काम पाहणार आहेत. फिल्मा स्त्र स्टूडियो हे या चित्रपटाचे वितरण करणार आहेत.  

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यानी आजवर अनेक चित्रपट,मालिकांमधून आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप त्यांनी उमटवली आहे. भिशी हा प्रकार विशेषत: महिला, कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक प्रचलित आहे. धमाल, कॉमेडी  आणि निखळ मनोरंजक कथानक असलेल्या या "भिशी मित्र मंडळ" चित्रपटात प्राजक्तासोबत आता सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे झळकणार असून अजुन कोणते कलाकार झळकणार यासाठी अजुन थोडी वाट पहावी लागणार आहे.

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव आघाडीवर आहे. आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. आता ती आपल्याला एका नवीन चित्रपटातून भेटायला येण्यास सज्ज झाली आहे. "भिशी मित्र मंडळ" असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव असून नुकतेच पुणे येथे या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. याप्रसंगी अभिनेत्री प्राजक्तासोबत  चित्रपटाचे निर्माते, प्रस्तुतकर्ते, लेखक, दिग्दर्शक आणि तांत्रिक टीम आवर्जून उपस्थित होती.

भिशी म्हणजे,  ग्रुपमधील सदस्य प्रत्येक महिन्याला ठराविक पैसे एकत्र करून ते टप्प्याटप्प्याने सर्वांना वापरण्यासाठी दिले जातात. साधारणत: प्रत्येक महिन्याला ग्रुपमधील एका सदस्याच्या घरी किंवा त्यांनी ठरवलेल्या एका ठिकाणी जमून, पैसे गोळा करून ते एक सदस्याला दिले जातात. भिशी हा प्रकार विशेषत: महिला, कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक प्रचलित आहे. धमाल, कॉमेडी  आणि निखळ मनोरंजक कथानक असलेल्या या "भिशी मित्र मंडळ" चित्रपटात प्राजक्तासोबत  कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार आहे यासाठी अजुन थोडी वाट पहावी लागणार आहे.