मुंबई : प्रिती झिंटा बॉलीवुडमधील दिग्गज अभिनेत्री आहे जिने बॉलीवुडचे सुपर स्टार्स खान्स पासून मोठमोठ्या स्टार्ससोबत काम केलंय. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमुळे ती पुन्हा चर्चेत आलीयं. #MeToo चळवळी विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने तिला सोशल मीडियात ट्रोल केलं जातंय. 'भैयाजी सुपरहिट' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती आली होती. यावेळी तिला
#MeToo मोहिमेबद्दल विचारण्यात आल्यावर तिने भलतंच उत्तर दिलंय.
Q. Did you ever have a #MeToo experience?
A. Giggle. Giggle. Ha ha. I wish I had!!!"Aaj ki sweetu, kal ki metoo ho sakti hai, ha ha": The lovely @realpreityzinta does some unexpected victim shaming pic.twitter.com/F0Rc05Cbws
— Prasanto K Roy (@prasanto) November 18, 2018
'तु लैंगिक शोषणाचा सामना केलायस का ?' असा प्रश्न प्रितीला विचारण्यात आला. त्यावर 'मेरे साथ कभी नही हुआ...काश मेरे साथ भी ये होता', असं उत्तर तिनं दिलं.
त्यामुळे #MeToo मोहिमेची सरळ सरळ खिल्ली उडवताना ती या व्हिडिओत दिसतेयं. आजची स्वीटू उद्या मीटू होऊ शकते असंही तिने सांगितलं.
अतिशय गंभीर प्रकरण मस्करीवर घेतल्याने प्रितीला सोशल मीडियात चांगलंच धारेवर धरलं जातंय.
'आपल्या या वक्तव्यावरून ती सध्या ट्रोल होतेयं. बॉलीवुडमध्येच इतकं आहे तर इतर क्षेत्रात तर यापेक्षा कितीतरी पट असेल', असंही प्रितीने सांगितलं. 'कमीत कमी आमच बोलणं इथं ऐकलं तरी जातं.पण इतर क्षेत्रात हे नाही असं जर म्हणत असाल तर हे साफ खोट आहे', असंही ती म्हणाली.
'संपूर्ण #MeToo मोहिमेवर तुझं काय म्हणणं आहे ?' असा प्रश्न तिला विचारण्यात आला. याला उत्तर देताना, 'अशी मोहिम सुरू होणं महत्त्वाचं आहे पण मला वाटतं याचा उपयोग योग्य ठिकाणी व्हायला हवा. आपल्या हुद्द्याचा उपयोग फायद्यासाठी करणारे महिला-पुरूष देखील खूप असल्याचे' तिने सांगितले.
'जेव्हा महिला याचा उपयोग वैयक्तिक फायदा किंवा प्रसिद्धी मिळविण्यासाठी करतात तेव्हा मला या मोहिमेबद्दल वाईट वाटतं असं स्पष्टीकरणही तिने दिलं.
अशा महिलांच प्रमाण इंडस्ट्रीत कमी असल्याचंही तिनं सांगितलं.
शोषणाच्या समस्येतून जाणाऱ्या अनेक महिला असून मी त्यांच्या कहाण्या ऐकल्याचेही' ती सांगते.