Breaking News : 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक, सोसायटी चेअरमनला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

आपल्या स्पष्ट वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या 'या' अभिनेत्रीला अहमदाबाद पोलिसांकडून अटक .

Updated: Jun 25, 2021, 02:41 PM IST
Breaking News : 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक, सोसायटी चेअरमनला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप title=

मुंबई : आपल्या स्पष्ट वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री पायल रोहतगीला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर सोसायटीच्या चेअरमनला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

चेअरमनच्या तक्रारीनंतर पायलला अटक करण्यात आलं आहे. पायलवर असा आरोप करण्यात आला आहे की, ती सोसायटीची सदस्य नसतानाही तिने मिटींगमध्ये प्रवेश केला आणि तिने भांडण करायला सुरुवात केली. त्याचबरोबर तिने चेअरमनबोरोबर सोसायटी मधील मेंबर्सना शिवीगाळ केली.

बिल्डिंगमध्ये खेळणार्‍या मुलांवरुन तिनं हे भांडण केलं आहे. कायम वादाच्या भोवऱ्यात असणारी पायल, याआधी नेहरू, गांधी परिवारावर आक्षेपार्ह भाष्य केल्याप्रकरणी वादात सापडली होती. या प्रकरणात तिला नंतर जामीन मंजूर झाला. पायलने तिच्या इंस्टाग्राम अकांऊन्टवर चेअरमनच्या विरोधात एक व्हिडिओ देखील पोस्ट केला होता.

कोण आहे पायल रोहतगी?
पायल रोहतगीने 2002 मध्ये 'ये क्या हो रहा है' या चित्रपटातून करिअरची सुरूवात केली. या सिनेमानंतर ती चित्रपटांमध्ये विशेष यश मिळू शकली नाही, यानंतर ती कायमच वादाग्रस्त विधान करुन चर्चेचा विषय ठरत आली आहे. पायलने रेसलर संग्राम सिंगसोबत लग्न केलं आहे. तिने वीस हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि बिग बॉसपासून ते खतरों के खिलाडीपर्यंतच्या अनेक रिएलिटी शोमध्येदेखील ती सहभागी झाली आहे. पायल तिच्या सोशल मीडियावरुन कायम दुसऱ्याविरोधात टिका करत असते. तिचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत.

पायलने कास्टिंग काउचबद्दलही अनेक खुलासे केले आहेत. भूमिका देण्याऐवजी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांनी तिला विविध ऑफर कशा दिल्या, हे तिने अनेकवेळा तिच्या मुलाखतीतुन सांगितलं आहे. तसंच कंगनाचं ट्विटर अकाउंट बंद केल्यावर पायलने बरेच प्रश्न उपस्थित केले होते.