मुंबई : मायकल जॅक्सन भले आज आपल्यासोबत नसले तरी ते डान्स प्रेमींच्या मनात ते आजही जिवंत आहेत. आजही अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये किंवा डान्स शोमध्ये त्यांच्या स्टेप्स कॅपी केल्या जातात. त्यांचा मून वॉक म्हणजे... काही सांगायची गरजचं नाही. त्यांच्या मून वॉकवर फक्त मुलीचं नाही तर मुलं देखील फिदा आहेत. पण आता फक्त त्यांच्या आठवणी आणि उभरत्या पॉपस्टार्ससाठी त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत. तर आज त्यांच्या Death Anniversaryच्या दिवशी जाणून घेवू त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे किस्से
- मायकल जॅक्सन त्यांच्या डान्सची जादू दाखवण्यासाठी मुंबईत आले होते, तेव्हा त्यांचं स्वागत अभिनेत्री सोनाली बेंद्रेने केलं. तेव्हा अनेक प्रसिद्ध स्टार्स त्यांना भेटण्यासाठी उत्सुक होते.
- त्यांचा 'थ्रिलर' हा अल्बम आजही तितकाचं प्रसिद्ध आहे.
- मायकल त्यांच्या डान्समुळे कायम चर्चेत असायचे, पण त्यांच्यावर अनेकवेळा लैंगिक आत्याचारासारखे गंभीर आरोप देखील करण्यात आले. 2002 साली जेव्हा त्यांनी एका मुलाला बालकनीतून बाहेर लटकवलं होतं, तेव्हा देखील ते तुफान चर्चेत आले. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली ते दोन दिवस तुरूंगातही होते.
- 2009 मध्ये लंडनला येऊन मी माझा शेवटचा कॉन्सर्ट करणार आहे असं मायकल जॅक्सनने जाहीर केलं होतं. मात्र 25 जून 2009 रोजी राहत्या घरी हृदय विकाराचा झटका आल्याने त्याचं निधन झालं. त्यांचं निधन झालं आणि डान्स प्रेमींना मोठा धक्का बसला.
- त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एकचं खळबळ माजली. फेसबूक, ट्विटर सर्वत्र फक्त आणि फक्त मायकल जॅक्सन यांचं निधन.
- महत्त्वाचं म्हणजे निधनानंतर दोन वेळा त्यांना पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलं. कारण मायकल यांची हत्या करण्यात आली अशी शंका त्यांच्या कुटुंबाला होती.
- त्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टच्या माध्यमातून समोर आलं की, मृत्यूपूर्वी त्यांनी अतिप्रमाणात ड्रग्सचं सेवन केलं होतं.
- मायकल जॅक्सन यांची अंतिम यात्रा सर्व ठिकाणी लाईव्ह प्रसारित करण्यात आली. आजही त्यांच्या आठवणी आपल्यात जिवंत आहे.