'लग्न झालंय...' 'वेड' फेम अभिनेत्री जिया शंकरचा व्हिडीओ व्हायरल

जियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर जियाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. 

Updated: Feb 20, 2024, 02:01 PM IST
'लग्न झालंय...' 'वेड' फेम अभिनेत्री जिया शंकरचा व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : वेड सिनेमातून घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री जिया शंकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी जिया नेहमीच काही ना काही शेअर करत असते.  बिग बॉस ओटीटी सीझन 2 मधून प्रसिद्ध झालेल्या जिया शंकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या व्हिडीओमध्ये अभिनेत्री तिच्या लग्नाविषयी बोलताना दिसत आहे.  अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जियाने वेड या सिनेमातून खूप प्रसिद्धी मिळवली. या सिनेमामध्ये तिने अभिनेता रितेश देशमुखसोबत स्क्रिन शेअर केली होती.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये जिया बोलाताना दिसते आहे की, 'मी तयार आहे. सरळ लग्नच करुया. ठीक आहे? कशाला पाहिजे बॉयफ्रेंडवैगरे, सरळ नवरा. ठिक आहे.' अभिनेत्री पुढे म्हणते की, 'वाव, ऑलमोस्ट मांग भरी मेरी. लग्न झालंय.' यानंतर अभिनेत्रीचा फोन खाली कोसळतो. पुढे अभिनेत्री म्हणते, ''लग्नासाठी तयार नाही, कृपया याबद्दल बोलू नका.'' अभिनेत्रीचा हा व्हिडीओ अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री सुदर साडीमध्ये दिसत आहे. 

अभिनेत्रीच्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर अनेकांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, जिया, मी तुझ्यासाठी अविवाहित बसलो आहे आणि तुझं लग्न झालं, तू माझ्यासोबत हे चांगलं नाही केलंस. तर अजून एकाने म्हटलंय, आमच्याकडचे ३५० पाहूणे येतील आणि तुझ्याकडचे किती? तर अजून एकाने म्हटलंय, आम्ही नेहमीच तुझ्यासोबत आहोत. तर अजून एकाने लिहीलंय, दिदी खूपच चुकिच्या भ्रमात आहे. तर अजून एकजण म्हणतोय, या लूकमध्ये गोडवा नाही दिसत आहे. सिंपल लूकमध्ये खूप भारी दिसता तुम्ही. तर अजून एकाने लिहीलंय, आवडलीस की मग आता!! अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर जियाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. जियाने एखादी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच अवघ्या काही वेळातच अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल होते.