‘खास’ व्यक्तिची साथ लाभलेल्या ‘त्या’ महिला खासदाराकडून बाळाचा पहिला फोटो पोस्ट

सोशल मीडियावर का होतायंत ट्रेंड.... 

Updated: Nov 5, 2021, 03:08 PM IST
‘खास’ व्यक्तिची साथ लाभलेल्या ‘त्या’ महिला खासदाराकडून बाळाचा पहिला फोटो पोस्ट  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : पश्चिम बंगालमधील चित्रपट जगतात नावारुपास आलेल्या आणि अभिनयाकडून राजकारणाकडे आपला मोर्चा वळवणाऱ्या एका चेहऱ्याची गेल्या काही दिवसांच बरीच चर्चा झाली. कारण होतं त्या व्यक्तीचं खासगी आयुष्य. थेट दिल्लीपर्यंत जाऊन खासदारकी भूषवणाऱ्या या चेहऱ्याचं नाव तसं सर्वांच्याच ओळखीचा.

दिवाळीच्या मुहूर्तावर याच चेहऱ्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांच्याच नजरा वळवल्या. या बहुचर्चित खासदारांचं नाव आहे, नुसरत जहाँ. पहिल्या लग्नातील वादळाच्या परिस्थितीनंतर आता नुसरत त्यांच्या खासगी आयुष्यात स्थिरावताना दिसत आहेत.

अभिनेता यश दासगुप्ता याच्याशी नाव जोडलं गेल्यानंतर आता नुसरत जहाँ जाहीरपणे त्याच्यासोबतचं नातं सर्वांसमोर स्वीकारताना दिसत आहेत. मुलाच्या जन्मानंतर त्यांनी वेळोवेळी या नात्याची ग्वाही दिली.

आता दिवाळीच्या निमित्तानं जहाँ यांनी सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले. या फोटोंमध्ये त्यांनी आपल्या नवजात बालतालाही समाविष्ट केलं आहे.

कोई वर्णन उपलब्ध नहीं है.

बाळाची लहानशी झलक सर्वांनाच दाखवत जहाँ यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तर, दुसऱ्या एका फोटोमध्ये त्या यशसोबत दिसल्या. यावेळी या जोडीनं एकसारख्याच रंगाचे कपडे झातले होते.

एखादी नववधू ज्या रुपात सर्वांसमोर येते त्याचप्रमाणे नुसरत जहाँ यांचा दिवाळी लूक होता. भागांतील कुंकवाची रेष त्यांच्या लूकला परिपूर्ण करत असून, सौंदर्याला चार चाँद लावत आहे.