Mouni Roy नं झाडाआड असं काही केली की, चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या

प्रत्येक रुपात तिचं सौंदर्य आणखी खुलून येतं.

Updated: Aug 17, 2021, 01:15 PM IST
Mouni Roy नं झाडाआड असं काही केली की, चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या  title=
छाया सौजन्य- इन्साग्राम

मुंबई : मालिका विश्वात आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या बळावर चाहत्यांची मनं जिंकणारी मौरी रॉय सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे.

मौनी ही तिच्या अभिनयासोबतच मादक सौंदर्यासाठीही ओळखली जाते. वेस्टर्न लूक असो किंवा ट्रेडिशनल, प्रत्येक रुपात तिचं सौंदर्य आणखी खुलून येतं. ही अभिनेत्री सध्या मालदीव येथे गेली असून, तिथं ती सुट्टीचा आनंद घेतना दिसत आहे.

मालदिवमध्ये असूनही तिनं चाहत्यांसोबतचं नातंही प्राधान्यानं जपलं आहे. म्हणूनच सुट्ट्यांदरम्यानही ती सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत आहे.

नुकतेच मौनीनं तिचे बिकीनीमधील फोटो पोस्ट केले. नारळाच्या झाडाच्या आड, उभ्या असणाऱ्या मौनीचं मादक सौंदर्य पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.

Mouni Roy looks beautiful

कमनीय बांधा, कोणा एके ठिकाणी रोखलेली नजर भलतीच जादू करत आहे. कधी कोणा झाडाच्या आड, तर कधी कुठे दुसरीकडेच मौनीनं उभं राहत दिललेया पोझ आणि तिचं हे व्हेकेशन फोटोशूट सध्या अनेक मॉडेल आणि अभिनेत्रींना फोटोशूट गोल्स देत आहे असं म्हणायला हरकत नाही.

Mouni Roy looks

सेलिब्रिटी सोशल मीडियाचा आधार घेत आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण करत असतात. मौनीही यात मागे पडलेली नाही. तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच फॅशन आणि लाईफस्टाईलबाबतच्या अनेक पोस्ट केल्या आहेत. त्यामुळं मालिका विश्वासोबतच ती खऱ्या अर्थानं सोशल मीडिया वर्तुळही गाजवतेय असंच म्हणावं लागेल.