मुंबई : नेहमीच सेलिब्रिटी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. पडद्यावर बोल्ड आणि ग्लॅमरस दिसणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री खऱ्या आयुष्यात वाईट दिवसांचा सामना करत असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अशा काही गोष्टी घडून जातात ज्याचा आपण कधी विचारही करु शकत नाही.
प्रत्येक स्त्रीचा आई बनण्याचा अनुभव एक सुख:द अनुभव असतो. पण जेव्हा एखाद्या स्त्रीचा गर्भपात होतो तेव्हा तो क्षण तिच्यासाठी खूप कठिण असतो. यातून रोज लाखो महिला जात असतात. अनेक सेलिब्रिटींच्याही वाट्याला हे दुख: आलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या वाट्याला हे दुख: आलं आहे.
शाहरुख खानची पत्नी गौरी खान
जरी आता शाहरुख आणि गौरी ३ मुलांचे पालक असले तरी, आर्यन खानला जन्म देण्याआधी अनेकदा गौरी खानने गर्भपाताचा सामना केला आहे. आर्यननंतर तिने सुहानाला जन्म दिला. यानंतर सरोगसीद्वारे या कपलने अबरामला जन्म दिला. आता हे कुटूंब खूप आनंदी कुटूंब आहे.
आमिर खानची पत्नी किरण राव
मिस्टर परफेक्शनिस्टची पत्नी किरण रावही या दुख:तून गेली आहे. हे संकट टाळण्यासाठी अभिनेत्याने खूप प्रयत्न केले, मात्र असं असूनही गर्भपातामुळे त्यांनी आपलं पहिलं मूल गमावलं.
काजोल देवगण
काजोल सुद्ध गर्भपात या दुख:तून गेली आहे. तिला देखील याचा सामना करावा लागला आहे. कभी खूशी कभी गम या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्री प्रेग्नंट होती. फिल्म हिट झाल्यानंतर तिचा गर्भपात झाला. आपल्या दुसऱ्या मिसकॅरेजनंतर काजोल आणि अजयला युग आणि न्यासा अशी दोन मुलं आहेत.
शिल्पा शेट्टी
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री शिल्पा शेट्टी 2010 मध्ये पहिल्यांदा प्रेग्नंट राहिली होती. पहिल्यांदाच असल्यामुळे अभिनेत्रीला काही समस्यांचा सामना करावा लागला ज्यानंतर तिला गर्भपाताचा सामना करावा लागला. शिल्पा इतकी उदास झाली की तिला वाटलं की ती पुन्हा कधीच गरोदर राहू शकणार नाही. आज तिला समिषा आणि विआन अशी दोन मुलं आहेत.