Madhuri Dixit Trolled: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. सध्या ती झलक दिख ला जा या टीव्ही शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे. सध्या ती 'झलक दिखला जा 10' (Jhalak Dikh la jha) मध्ये जज म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. (actress madhuri dixits new look shocked everyone netizens says is she had done face surgery actress gets troll)
माधुरीसोबतच करण जोहर आणि नोरा फतेही या शोचे जज आहेत. 'झलक दिखला जा' पाच वर्षांनंतर टीव्हीवर परतला आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात माधुरी यांचा चेहरा इतका वेगळा दिसतो आहे की त्यावरून लोक तिने सर्जरी केली आहे का? असा अंदाज लावत आहेत.
'झलक दिखला जा 10' च्या सेटबाहेर माधूरी लाल रंगाच्या सुंदर साडीत दिसली होती. पापाराझीने एका इंस्टाग्रामवर पेजवरून माधूरीचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. व्हिडिओमध्ये ती सुंदर दिसत आहेच पण तिच्या चेहऱ्यावर केमिकल ट्रीटमेंट घेतल्याची प्रतिक्रिया काही लोकांनी दिली आहे. हे कितपत खरे आहे याची माहिती समोर आली नाही परंतु त्यावरून नेटकरी मात्र कमेंट्स करत आहेत.
हा व्हिडीओ पाहून तिनं ओठांचीही सर्जरी केली आहे का यावरही अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.