'त्यानं' अभिनेत्री कोएना मित्राला दिली 'नाइट आऊट'ची ऑफर, तक्रार दाखल

बॉलिवूड अभिनेत्री कोएना मित्रा हिला एका अज्ञात व्यक्तीनं फोनवरून 'नाईट आऊट'ची ऑफर दिली. याबद्दल अभिनेत्रीनं पोलिसांत तक्रार दाखल केलीय. 

Updated: Aug 3, 2017, 11:36 PM IST
'त्यानं' अभिनेत्री कोएना मित्राला दिली 'नाइट आऊट'ची ऑफर, तक्रार दाखल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कोएना मित्रा हिला एका अज्ञात व्यक्तीनं फोनवरून 'नाईट आऊट'ची ऑफर दिली. याबद्दल अभिनेत्रीनं पोलिसांत तक्रार दाखल केलीय. 

फोनवरून अश्लील संभाषण करत छळवणूक केल्याची तक्रार ३७ वर्षीय कोएना मित्रानं पोलिसांत दिलीय. नाईट आऊटसाठी या व्यक्तीनं कोएनाला पैसेही देण्याची ऑफर दिली. सलग दोन - तीन दिवस वेगवेगळ्या क्रमांकावरून कोएनाला कॉल केले. या व्यक्तीच्या अश्लील संभाषणाला कंटाळून अखेर कोएनानं ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी अज्ञाताविरोधात आयपीएसी कलम ५०९ अंतर्गत महिलेचा आत्मसन्मान दुखावण्याच्या हेतून शब्दांचा वापर, हाभवाव वा कृत्य करण्याचा गुन्हा दाखल केलाय. 

कोएनानं मुसाफिर, एक खिलाडी एक हसीना, अपना सपना मनी मनी यांसारख्या सिनेमांत काम केलंय. याशिवाय कोएनानं मॉडेलिंग क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केलीय.