तैमूरबाबत करीनाने खोलले हे रहस्य, सैफला ठेवायचे होते हे नाव

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी जेव्हा आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले तेव्हा त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. 

Updated: Mar 11, 2018, 09:28 AM IST
तैमूरबाबत करीनाने खोलले हे रहस्य, सैफला ठेवायचे होते हे नाव title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी जेव्हा आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले तेव्हा त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. 

अनेकांनी तर त्यांना मुलाचे नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, इतक्या टीकेनंतरही सैफ आणि करीनाने आपल्या मुलाचे नाव बदलले नाही. 

करीनाने आपल्या मुलाच्या नावाबाबत नुकताच एक खुलासा केलाय. यात तैमूर हे नाव सैफचे नव्हे तर तिचे आवडते होते असे करीनानो सांगितले. एका चॅनेलच्या कार्यक्रमादरम्यान करीनाने तैमूरच्या नावाबाबतचे हे रहस्य उलगडले. 

मला माझ्या मुलाचा नावाचा अभिमान

यावेळी करीनाला मुलाच्या नावावरुन सोशल मीडियावर ट्रोल होण्याबाबत विचारले असता ती म्हणाली, सोशल मीडियावर असे प्रकार सुरु असतात. मात्र त्यादरम्यान अनेक लोक आमच्या बाजूने होते. त्यामुळे अशा टीकेला मी महत्त्व देत नाही. 

करीना पुढे म्हणाली, ज्या दिवशी मी डिलिव्हरीसाठी रुग्णालयात गेले. तेव्हा सैफने मला फैज हे नाव सुचवले. फैज हे अधिक काव्यात्मक आणि रोमानी नाव असल्याचे सैफने मला सांगितले. तेव्हा मी म्हणाले, तैमूरचा अर्थ पोलादी आहे आणि मी मुलाला जन्म देणार. माझा मुलगा योद्धा होईल. मला माझ्या मुलाच्या नावाचा अभिमान आहे. 

तैमुरचे नाव चर्चेत असणे आवडत नाही

तैमुर सतत मीडियामध्ये चर्चेत असतो याबाबत करीनाला विचारले असता, ती म्हणाली तैमुर सतत चर्चेत राहणे मला आवडत नाही. लोक त्याच्या प्रत्येक कृतीचे भांडवल करतात. त्याच्या हेअरस्टाईलपासून ते इतर वस्तूंबाबत चर्चा करतात. तो आता फक्त १४ महिन्यांचा आहे.