...म्हणून कंगना उभारणार देवीचं भव्य मंदिर

भव्य देवीचं मंदिर उभारण्याची कंगनाची इच्छा 

Updated: Dec 10, 2020, 03:50 PM IST
...म्हणून कंगना उभारणार देवीचं भव्य मंदिर title=

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतची ओळख एक वादग्रस्त अभिनेत्री म्हणून देखील जाते. प्रत्येक मुद्द्यावर आपली भूमिका मांडत ती सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असते. आता देखील ती एका वेगळ्या करणामुळे चर्चेत आली आहे. ती आता एक भव्य देवीचं मंदिर उभारणार आहे. भव्य देवीचं मंदिर उभारण्याची इच्छा तिने ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली. मंदिर उभारण्यासाठी माता दुर्गाने मला निवडले आहे, असं ट्विट करत तिने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

कंगनाने आपल्या ट्विटसोबतच कुलदैवताच्या मंदिराचा फोटो देखील शेअर केला आहे. 'मंदिर उभारण्यासाठी माता दुर्गाने मला निवडले आहे. जे आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी उभारले आहे. मला एक दिवस माता दुर्गेसाठी असं मंदिर उभारायचं आहे. जे तिची किर्ती आणि आपल्या महान संस्कृतीला साजेसे असेल. जय माता दी...' असं ट्विट कंगनाने केलं आहे. 

सध्या तिचं हे ट्विट आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे देशाचे राजकारण चांगलेचं तापले आहे. अशात ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत तिने पंजाबच्या एका वृद्ध महिलेची खिल्ली उडवणारं ट्विट केले. त्यामुळे देखील ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. पण काही वेळानंतर तिने ट्विट डिलीट केलं. पण त्या ट्विटमुळे तिच्या अडचणीमध्ये वाढ झाली.