करिअरच्या सुरुवातीलाच 'या' 21 वर्षीय अभिनेत्रीचा किसिंग सीनला नकार! म्हणाली, ''मलाही आजच पश्चात्ताप...''

Jannat Zubair No Kissing Policy: हल्ली मनोरंजन विश्वात चर्चा असते ती म्हणजे किसिंग सीन किंवा बोल्ड सीन्सची परंतु एका अभिनेत्रीनं मात्र वयाच्या 16-17 वर्षी किसिंग सीन (No Kissing Scene) देण्यास नकार दिला होता. एका मुलाखतीत तिनं याबद्दलचा खुलासा केला आहे. आपल्याला याबद्दल जराही पाश्चात्ताप झाला नसल्याचे ती सांगते. 

गायत्री हसबनीस | Updated: May 28, 2023, 05:57 PM IST
करिअरच्या सुरुवातीलाच 'या' 21 वर्षीय अभिनेत्रीचा किसिंग सीनला नकार! म्हणाली, ''मलाही आजच पश्चात्ताप...'' title=
May 28, 2023 | Jannat Zubair मनोरंजन क्षेत्रात किसिंग सीन्स सर्रासपणे दाखविले जातात. परंतु नो किसिंग सीन पॉलिसी फॉलो करणाऱ्याही अनेक अभिनेत्री आहेत. (Photo: Jannat Zubair Instagram)

Jannat Zubair No Kissing Policy: सध्या मनोरंजन क्षेत्रात किसिंग किस आणि इन्टिमेट सीन्स हे सर्रासपणे दाखवले जातात. त्या कथेची ती गरज असते असं स्पष्टीकरण अनेकदा कलाकारांकडून दिले जाते. हे खरं मानलं तरी मात्र ट्रोलर्स हे त्यांना सपाटून ट्रोल करताना दिसतात. असे सीन्स देणं म्हणजे पैशांसाठी देणं अशी नेटकऱ्यांची टिका (Intimate Scenes in Bollywood) असते. गेल्या काही वर्षांत सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे सेक्रेड गेम्समधल्या बोल्ड सीन्सची. परंतु असं असलं तरी नो किसिंग पोलिसी फॉलो करणाऱ्या (No Kissing Policy Bollywood Actress) अनेक अभिनेत्रीही आहेत. त्यातील अगदी समोरचं उदाहरणं म्हणजे दाक्षिणात्त्य अभिनेत्री साई पल्लवी. 

त्यात अजून एका अभिनेत्रीचे नावं समोर येतं आहे आणि ते म्हणजे जन्नत जुबैर. जन्नत (Jannat Zubair) तिच्या लहानपणापासून अभिनयक्षेत्रात सक्रिय आहे. तिनं लोकप्रिय हिंदी मालिकांतूनही कामं केली आहेत. परंतु तिनंही एकदा किसिंग सीन करण्यास नकार दिला होता. जन्नतचे वडिल हेही लोकप्रिय अभिनेते आहेत तर तिची आई एक होममेकर आहे. जन्नचे इन्टाग्रामवरही असंख्य फॉलोवर्स आहेत. ती आपल्या चाहत्यांनाही कायमच अपडेट ठेवत असते. तिनं अभिनयासोबतच गाण्यातही आपलं करिअर केलं आहे. तिनं 'बाबू शोना मोना' हे गाणं काही महिन्यांपूर्वी रेकॉर्ड केलं होतं. आता ती सलमान खानच्या 'बिग बॉस ओटीटी 2' मधून दिसणार आहे. 

हेही वाचा - ''पोट खूप सुटलंय तुमचं'' नेटकऱ्यांच्या कमेंट्सवर भडकली अभिज्ञा भावे, काय म्हणाली पाहा

ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आपल्या नो किसिंग पॉलिसीबद्दल खुलासा केला आहे. ज्यात तिनं सांगितले होते की 'तू आशिकी' या शोसाठी तिला किसिंग सीन करण्यासाठी सांगितला होता परंतु तो तिनं नाकारला होता. तिनं सांगितलं की ती 16-17 वर्षांची होती. त्यावेळी आपल्या आणि आपल्या पालकांच्या निर्णयावर ठाम राहण्याचे ठरविले होते. ज्यासाठी खूप मोठं धाडस लागतं असं तिनं सांगितलं होतं. तिनं सांगितलं की हा धाडसी निर्णय फक्त ती आपल्या पालकांकडूनच शिकू शकली आहे आणि याबद्दल तिला सुदैवानं कुठल्याही नकारात्मक कमेंट्स आलेल्या नाहीत. 

या मुलाखतीतून तिनं आपला संघर्ष प्रवासही सांगितला होता. यामध्येही तिला तिच्या आईवडिलांची मोठी मदत झाली असल्याचे तिनं सांगितले होते. आपण नो किसिंग पॉलिसी फॉलो करतो यावर ठाम आहोत, अशी भुमिका तिनं ठेवली होती आणि तिच्या वडिलांनीही तिला याबद्दल किसिंग सीन न देण्यास सांगितले होते. आपल्याला या निर्णयाचा जराही पाश्चात्ताप होत नाही असं तिनं सांगितलं आहे.