दुसऱ्या धर्मातील अन् 8 वर्ष लहान अभिनेत्याशी लग्न; 40 व्या वर्षी झाली आई...; अनेक वर्षानंतर अचानक 'ही' अभिनेत्री चर्चेत!

Actress Marriage to 8 yr Younger Actor and Became mother at 40 : अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 8 वर्ष लहान असलेल्या अभिनेत्यासोबत लग्न आणि वयाच्या 40 व्या वर्षी आई होण्यावर वक्तव्य केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 1, 2024, 10:54 AM IST
दुसऱ्या धर्मातील अन् 8 वर्ष लहान अभिनेत्याशी लग्न; 40 व्या वर्षी झाली आई...; अनेक वर्षानंतर अचानक 'ही' अभिनेत्री चर्चेत! title=
(Photo Credit : Social Media)

Actress Marriage to 8 yr Younger Actor and Became mother at 40 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री किश्वर मर्चेंट आणि तिचा नवरा सुयश राय यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्या दोघांनी छोट्या पडद्यावर अप्रतिम काम केलं आहे. त्यासोबत त्यांचं नातं देखील तितकंच चर्चेत होतं. त्याचं कारण म्हणजे किश्वर मर्चेंट आणि सुयश राय यांचं इंटर रिलीजन लग्न आणि त्यांच्यात असलेला वयाचा फरक आहे. त्या दोघांमध्ये वयाचा खूप मोठा फरक आहे. त्या दोघांमध्ये 8 वर्षांता फरक असून ते दोघं सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत होते. दरम्यान, किश्वरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वयाच्या 40 व्या वर्षी आई होण्याच्या निर्णयावर वक्तव्य केलं आहे. 

किश्वर मर्चेंटनं ही मुलाखत देबिना बॅनर्जीच्या शोवर दिली होती. त्या दरम्यान, तिनं वयानं 8 वर्ष लहान असलेल्या सुयश रायशी लग्न आणि 40 व्या वर्षी आई होण्याच्या निर्णयावर वक्तव्य केलं. तिनं सांगितलं की कशा प्रकारे तिनं या सगळ्या गोष्टींना सांभाळलं. खरंतर किश्वर मर्चेंट ही मुस्लिम आहे तर सुयश हा हिंदू आहे. त्या दोघांनी 2016 मध्ये लग्न केलं. त्या दोघांमध्ये फक्त एकच अडतण होती आणि ती म्हणजे त्यांच्यात असलेला वयाचा फरक. सुयशची आई आधी या नात्याला नकार देत होती. मात्र, सुयश आणि किश्वरमध्ये कधीच धर्मावरून भांडणं झाली नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आता किश्वरनं तिच्यातील आणि सुयशच्या वयातील फरकावर वक्तव्य केलं आहे. खरंतर किश्वर, सुयशपेक्षा वयानं 8 वर्षांनी मोठी आहे. किश्वर म्हणाली, माझ्यासाठी थोडं कठीण होतं. सुयशच्या आईकडून नकार होता. मी आता समजू शकते कारण मी देखील एक आई आहे. जर माझा मुलगा मला येऊन बोलेल की त्याला 8 वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलीशी लग्न करायचं आहे तर मला ही धक्का बसेल. आताच्या काळाविषयी बोलताना किश्वर म्हणाली, आता या गोष्टीला घेऊन काही अडचण होत नाही. जेव्हा तिनं लग्न केलं होतं तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात यायचा. आता अनेकांनी त्यांच्यापेक्षा वयानं लहान असलेल्या मुलांशी लग्न केलं आहे. 

सुरुवातीला सासूसोबत तिचं काही चांगलं बॉन्ड नव्हतं असं सांगत किश्वर पुढे म्हणाली आमच्यात सुरुवातीला काही ठीक नव्हतं, पण जसा वेळ जाऊ लागला सगळं काही ठीक होऊ लागलं होतं. 

वयाच्या 40 व्या वर्षी नॅच्युरली प्रेग्नंट राहण्यावर क्रिश्वरनं वक्तव्य केलं. याविषयी बोलत किश्वरनं सांगितलं की तिला तर आधी माहितही नव्हतं की ती प्रेग्नंट आहे. तिची प्रेग्नंसी ही प्लॅन्ड नव्हती. सुयशला बाळ होण्याविषयी काहीही चिंता नव्हती. पण त्याच्या आईची इच्छा होती की दोघं लवकरात लवकर आई-वडील झाले पाहिजे. सुयश आणि किश्वरनं आई-वडिलांना सांगितलं की ते पेट पेरेंट्स होऊन आनंदी आहेत. तर डिलिव्हरीवर किश्वर म्हणाली, की तिनं सी सेक्शन डिलिव्हरी केली होती. तिला कोणतीही कॉम्पलीकेशन्स नव्हते पण तिनं स्वत: हा निर्णय घेतला होता की ती सी-सेक्शननं बाळाला जन्म देईल. 

हेही वाचा : 'आम्ही रोज भांडायचो', लग्नानंतर जेव्हा ऐश्वर्यानं नात्यावर सोडलं होतं मौन; अभिषेकनं दिलं होतं स्पष्टीकरण

किश्वरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती सगळ्यात शेवटी 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फना इश्क में मरजावां' मध्ये दिसली होती. त्याशिवाय ती वेब सीरिज डियर इश्कमध्ये दिसली होती. ही सीरिज गेल्यावर्षीच प्रदर्शित झाली होती.