मुंबई : सोनी टीव्हीचा शो 'एक दिवाना था' शो प्रेक्षकांच्या पसंतीस पडतोय. यातील डोनल बिष्ट शरण्याच कॅरेक्टर करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अभिनेत्री डोनल बिष्ट सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. तिच्या अफेयरची चर्चा सध्या सेट वर सुरू असते. 'इंडिया फोरम' ने दिलेल्या वृत्तानुसार, डोनल बिष्ट आणि शो चा दिग्दर्शक प्रतिक शाह बरेच दिवस एकमेकांना डेट करत आहेत. शूटींग दरम्यान दोघेही एकमेकांच्या जास्त जवळ आल्याचे म्हटले जात आहे. आतापर्यंत सेटवरी सर्वांना या जोडीबद्दल काळलंय. डोनल उशीरा येऊनही तिला शूटींगसाठी प्राधान्य दिलं जाऊ लागलं तेव्हाही सेटवर इतर कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींना याचा अंदाज आला. डोनल आणि प्रतिक काही दिवसांपूर्वी गोव्यात सुट्टी एन्जॉय करायला गेल्याची देखील चर्चा आहे.
जेव्हा डोनलला प्रतिकसोबतच्या नात्याबद्दल विचारलं गेलं तेव्हा 'ही केवळ अफवा असल्याचं तिने सांगितलं.
आमच्यामध्ये असं काही नाही. आम्ही फक्त एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रिण आहोत. तो एक दिग्दर्शक आणि मी अभिनेत्री आहे. सध्या तरी मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचय.' असं तिने सांगितलं.