दीपिकाने बॉलिवूडमधील खान बंधूंना या बाबतीत टाकले मागे...

सह-कलाकारांपेक्षाही तिचे मानधन जास्त आहे.

Updated: Jan 22, 2019, 08:42 PM IST
दीपिकाने बॉलिवूडमधील खान बंधूंना या बाबतीत टाकले मागे...  title=

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने सिनेजगतात आपले नाव उच्चस्थानी नेले आहे. आज ती बॉलिवूडमधील सर्वात मोठी अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये बाकी अभिनेत्रींच्या तुलनेत ती अव्वल स्थानी आहे. सर्वात जास्त मानधन घेणारी सध्यातरी ती एकमेव अभिनेत्री आहे. सिनेमातील सह-कलाकारांपेक्षाही तिचे मानधन जास्त आहे. उल्लेखनीय कामगिरी त्याचबरोबर दिग्दर्शकांचा तिच्यावर असलेला विश्वास आणि चाहत्यांचे प्रेम यामुळे ती यशाच्या शिखरावर पोहोचली आहे.  बॉलिवूडमधील प्रसिद्ध तीन खानांनासुद्धा तिने मागे टाकले आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत दीपिकाने सांगितले 'मागील वर्ष माझ्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या फार खास होते. माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की अभिनय क्षेत्रात मी अव्वल स्थानी आहे. आपले नाव यशाच्या शिखरावर आहे, यापेक्षा अधिक आनंद देणारी दुसरी कोणतीच गोष्ट नाही. भारतीय क्रिकेटचे कर्णधार विराट कोहली नंतर मानधन स्वीकारण्याच्या यादीत दीपिकाचा दुसरा नंबर लागतो.