'या' अभिनेत्रींनी आपल्यापेक्षा लहान पार्टनरसोबत बांधली लग्नगाठ

बापरे! अभिनेत्रींनी निव़डला 11 वर्षांनी लहान पार्टनर, कोण आहेत या अभिनेत्री?

Updated: Aug 21, 2022, 04:43 PM IST
'या' अभिनेत्रींनी आपल्यापेक्षा लहान पार्टनरसोबत बांधली लग्नगाठ title=

मुंबई : प्रेम हे प्रेम असतं, प्रेमात वय आणि दिसण जास्त गरजेचं नसत. मन जुळली कि सर्वंच जुळुन येत. असचं काहीसं या अभिनेत्रींसोबत घडलंय. या अभिनेत्रींचे लाईफ पार्टनर हे त्यांच्यापेक्षा खुप वर्षांनी लहान आहेत. त्यामुळे त्यांची लव्हस्टोरी चर्चेत असते. आता या अभिनेत्री कोण आहेत ते जाणून घेऊय़ात. 

प्रसिद्ध सिंगर नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांची लव्हस्टोरी खुप हटके आहे. नेहा कक्कर गायक रोहनप्रीत सिंगपेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे. दोघांच्या प्रेमकहाणीची खूप चर्चा झाली होती. दोघांच एक गाण सुद्धा आलं होत, हे गाण खुप हिट ठरलं होतं. 

युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला यांच्या वयात सुमारे सात वर्षांचा फरक आहे.'बिग बॉस'च्या सेटवर दोघांची भेट झाली होती. दोघांचीही लव्हस्टोरी खुप खास आहे.  

अभिनेत्री तनाज इराणी पती बख्तियार इराणी यांच्यापेक्षा सात वर्षांनी मोठी आहे. पण या वयामधीत अंतराचा त्यांच्या नात्यावर काहीच परिणाम झाला नाही आहे. 

अभिनेत्री गौहर खानने जैद दरबारला आपला जीवनसाथी बनवले आहे. दोघांनी 2020 मध्ये लग्न केले होते. विशेष म्हणजे जैद दरबार वयाने गौहर खानपेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. 

अभिनेत्री किश्वर मर्चंट आणि अभिनेता सुयश राय यांच्या वयात सुमारे सात वर्षांचा फरक आहे. या दोघांच्या जोडीने 'बिग बॉस'मध्येही खूप मने जिंकली होती. दोघांनीही ऑनस्क्रीन आई-मुलाच्या भूमिका केल्या आहेत.